अर्धापूरात अनाधिकृत दारूविक्री बंद करा- अधिकृत दारू विक्रेत्याची मागणी

अर्धापूर पोलीसांना दिले मागणीचे निवेदन.

अर्धापूर दि.24 (शेख जुबेर ) अर्धापूर शहरातसह तालुक्यात दिवसाढवळ्या अनाधिकृत दारूविक्री खुलेआम सुरू आहे. ती अनाधिकृत दारू विक्री बंद करावी अशी मागणी अधिकृत दारू विक्रेते यांनी शनिवारी (ता.24) पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अर्धापूर तालुक्यात सर्वच धाब्यावर आणि इतर ठिकाणी खुलेआम पणाने अनाधिकृत दारू विक्री चालु आहे. एखाद्या परमिट रूम सारखे ग्राहकांना बसवून दारू विक्री केली जात आहे. त्यामुळे राज्य शासनाचा महसूल सुध्दा प्रचंड प्रमाणात बुडत आहे.तालुक्यात जागोजागी होणारी अनाधिकृत दारू विक्री बंद करावी अशी मागणी करण्यात आली.
या निवेदनावर स्वराज बार,रविराज बार,साईबाबा बार,ईश्वर बार, क्रांती बार,राज बार,चंद्रलोक बार,आर्यन बार, जंजिरा बार,श्लोक बार,ग्रीन व्हिल बार,मयुर बार,प्रिती बार यांच्या मालकांच्या स्वाक्षरी आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post