मोक्का मधील फरार आरोपीस 01 गावठी पिस्टल 06 जिवंत काडतुस व एक मोबाईल सह स्थानिक गुन्हे शाखेकडुन अटक
नांदेड जिल्हयातील अनिल पंजाबी यांचे गैंग मधील सर्व आरोपीतांना पोलीस ठाणे शिवाजीनगर गुरंन 379/2021 कलम 395 भा द वि गुन्हयामध्ये मोक्का लावण्यात आला होता. सदर गुन्हयातील फरार आरोपी नामे शेख अजरोद्यीन ऊर्फ बांगा शेख रहीमोधीन रा श्रावस्तीनगर, नांदेड हा फरार होता. सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेवुन अटक करण्याबाबत मा. प्रमोद शेवाळे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांनी स्था. गु शा. येथील अधिकारी व अमलदार यांचे पथक तयार केले होते.

 
सदर गुन्हयाचा स्था. गु. शा. नांदेड व पोलीस ठाणे सोनखेड यांचेकडुन समांतर तपास चालू असताना, दिनांक 27/02/2022 रोजी पोलीस ठाणे शिवाजीनगर गुरंन 379/2021 कलम 395 भा द वि सहकलम 3(1)(i). 3(2), 3(4) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियत्रंण अधिनियम मधील फरार आरोपी हा शेख अजरोद्यीन ऊर्फ बांगा शेख रहीमोद्यीन रा श्रावस्तीनगर, नांदेड हा मुगट येथे येणार असल्याबाबत खात्रीशिर माहीती श्री व्दारकादास चिखलीकर पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेड यांना मिळाल्याने त्यांनी स्थागुशाचे अधिकारी व अमंलदार यांना सोबत घेवून सरकारी दवाखाना मौजे मुगट येथे सापळा रचुन शेख अजरोद्यीन ऊर्फ बांगा शेख रहीमोद्यीन रा श्रावस्तीनगर, नांदेड यास ताब्यात घेतले. नमुद आरोपीचे ताब्यात एक गावठी बनावटीचे पिस्टल सहा जिवंत काडतुस एक मोबाईल व एक फोर्ड कंपनीची इंडीव्हर चारचाकी जिप क्रमांक एम एच 14 बीसी 0289 किमती 1500000/- असा एकुण 15,60,000/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपी पुढील तपासकामी पो स्टे शिवाजीनगर यांचेकडे देण्यात आले आहे. नमुद आरोपीताविरुध्द नांदेड व पुणे जिल्हयामध्ये मालाविरुध्दचे खालील गुन्हयामध्ये आरोपी पाहीजे होता.
 
अ. क्र. पोस्टे गुरनं कलम 395 भा द वि सहकलम 3(1)(ii) 3(2), 3 (4) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 395 भा द वि सह 3/25 भा ह का शिवाजीनगर, नांदेड
379/2021 380/2021
 
विमानतळ नांदेड ग्रामीण, कोंडवा जि. पुणे
307/2021 710/2021 124/2022
 
395 भादवि सह 3/25 भा ह का 395 भादवि सह 3/25 भी ह का
397 भादवि सह 3/25 भाह का कोंडवा जि. पुणे
 
116/2022 118/2022
392,34 भादवि सह 3/25 भा ह का 392,34भा द वि सह 3/25 भा ह का कोंडवा जि. पुणे
 
39/2022 13/2022
392.34 भादवि सह 3/25 भा ह का 392.34 भादवि सह 3/25 भा ह का
वानवडी जि पुणे 09 कोरेगाव पुणे
 
नमुद आरोपीविरुद्ध मोक्का मधील फरार आरोपी असुन वरील गुन्हयात सदर आरोपी पाहीजे होता. नमुद आरोपीकडुन आणखीन गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
 
सदरची कामगिरी मा. श्री प्रमोद शेवाळे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री निलेश मोरे अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री व्दारकादास चिखलीकर पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेड सपोनि/ पांडुरंग भारती पोउपनि सचिन सोनवणे, अशिष बोराटे, सपोउपनि/ गोविंद मुंडे, जसवंतसिंघ शाहु, पोह/ भानुदास वडजे, सखाराम नवघरे, मारोती तेलंग, संजय केंद्रे, पो ना अफजल पठान, पो ना/ पदमा कांबळे, राजु सिटीकर, विठल शेळके, पो कों/ तानाजी येळगे, मोतीराम पवार विलास कदम, पोकों/ गजानन बयनवाड बालाजी मुंडे यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post