15000 फुट उंच हिमशिखरावर शिवजयंती.परभणी : मोहम्मद बारी जिल्हा प्रतिनिधी / उत्तराखंड मधील पांगरचुला व तुंगनाथ या दोन 15000 फूट  उंच हिमपर्वतावर विविध राज्यातून एकत्र येवून तरूण शिवप्रेमी गिर्यारोहकांनी  शिवजयंतीदिनी विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांना शिवघोषणा देवून अभिवादन केले.
दिल्ली येथील तरूण राहूल शर्मा या गिर्यारोहकाने उत्तराखंडमधील पांगरचूला व तुंगनाथ येथे या हिवाळी मोहीमेची योजना आखली.

हैद्राबादचा हर्षादित्य बिजापुरी व परभणीचे रणजित कारेगांवकर यांनी चर्चेतून ठरवले की या मोहिमेत 19 फेब्रुवारी रोजी पांगरचुला व तुंगनाथ या हिमपर्वतावर शिवजयंती साजरी करायची. 18 फेब्रुवारी रोजी तुगासी या गावातून गिर्यारोहणास सुरूवात झाली. सर्व गिर्यारोहकांनी सायंकाळी खुलारा येथे उने 15अंश तापमानात हिमपर्वतावरील बेसकॅम्पवर मुक्काम केला. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता सर्व गिर्यारोहक खुलाराहून पांगरचुला हिमपर्वत सर करण्यास रवाना झाले. सकाळी दहा वाजता शिखरावर जाऊन शिवप्रतिमा असलेले ध्वज फडकवून, छत्रपती शिवाजी महाराज की जय चा जयघोष करत सर्वांनी शिवरायांना अभिवादन केले. तेलगू भाषिक हर्षादीत्य बिजापुरी यांनी शिवस्तुतीपर मराठी घोषणा गाऊन एक वेगळा रोमांच निर्माण केला. दुस-या दिवशी 20 फेब्रुवारी रोजी जगातील सर्वांत उंच शिवमंदीर असलेल्या तुंगनाथ येथेही गिर्यारोहन करून शिवघोषणा देत या  गिर्यारोहकांनी शिवजयंती साजरी केली. याप्रसंगी परभणीचे सहायक निबंधक माधव यादव, रणजित कारेगांवकर, विष्णू मेहेत्रे, प्रदीप धर्मशेट्टी, राजस्थान येथील संदीप सैनी, उत्तराखंड गढवाल येथील रोहीत शर्मा, दिल्ली येथील विष्णू सिंग, काजल गुप्ता, तेलंगनाचे डाॅ.श्रीकांत व डाॅ.उदयकुमार, स्थानिक गाईड सुनिल सिंग आदी तरूण गिर्यारोहकांनी सहभाग नोंदवत शिवजयंती उत्साहात साजरी केली.

Post a Comment

Previous Post Next Post