नगरसेविका सौ.करूणा कोकाटे यांच्या प्रयत्नातून सांगवी बु. येथे 3 वाचन कट्टे सुरूदि.१६, नांदेड- सांगवी बु. प्रभाग 03 मध्ये नगरसेविका सौ. करूणा भीमराव पा. कोकाटे यांच्या प्रयत्नातून  तीन ठिकाणी वाचनकट्टयाचे उद्घाटन मान्यवर पत्रकार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी दैनिक सामनाचे जिल्हा आवृत्ती संपादक श्री विजय जोशी, दैनिक गोदातीर चे उपसंपादक श्री पंढरीनाथ बोकारे, दैनिक लोकपत्रचे जिल्हा आवृत्ती संपादक तथा प्राचार्य डॉ.गणेश जोशी, दैनिक उद्याचा मराठवाडा चे उपसंपादक राम तरटे, दैनिक गोदातीर चे उपसंपादक  प्रल्हाद कांबळे, पत्रकार प्रवीणकुमार सेलूकर, छायाचित्रकार ज्ञानेश्वर सुनेगावकर, किरण कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते,
आज पासून सांगवी ब. प्रभागातील नागरिकांना दररोज दहा ते बारा वृत्तपत्र परिसरातील तीन वृत्तपत्र वाचन कट्ट्यावर उपलब्ध होणार आहेत. यामुळे नक्कीच त्यांच्या माहिती आणि ज्ञानात भर पडेल व वाचनाची सवय लागेल, आजच्या घडीला ज्ञाना एवढे मूल्यवान दुसरं काही नाही, आजही वर्तमानपत्रा  मधील बातम्या व माहितीवर जेवढा नागरिकांचा विश्वास आहे, तेवढा अन्य कुठल्याही समाज माध्यमांवर  नाही, स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी, चालू घडामोडीतील प्रत्येक विषयाची अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांना व नागरिकांना असणे अत्यावश्यक आहे, प्रभागातील अनेक  विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत ते शहरा मध्ये जाऊन वृत्तपत्र वाचन करतात यामुळे त्यांचा वेळ वाया जात होता, वर्तमान पत्र वाचन कट्ट्याची माहिती मिळताच अनेक विद्यार्थ्यांनी व प्रभागातील शिक्षणप्रेमी नागरिकांनी फोन लावून तसेच मेसेज पाठवून नगरसेविका सौ करुणा कोकाटे आणि नगरसेवक प्रतिनिधी शाम भाऊ कोकाटे यांचे आभार व्यक्त  केले, या वृत्तपत्र वाचन काट्यामुळे नक्कीच अधिकाधिक संख्येने वाचकांची संख्या वाढेल व वाचन संस्कृतीचा वारसा जपला  जाईल असा विश्वास नगरसेवक प्रतिनिधी तथा युवक काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष श्याम पाटील कोकाटे यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी गावातील हनुमान मंदिर समितीचे अध्यक्ष पंडितराव कोकाटे, देविदासराव पवार,सुभाषराव कोकाटे,भीमराव कोकाटे, आनंदराव कोकाटे, दिगंबरराव अंभोरे, आनंदराव पवार, संभाजीराव सूर्यवंशी, प्रा. बाबासाहेब भुक्‍तरे ,विनायक सोमठाणकर, आनंदराव शिंदे, मुंगल सर, युवक काँग्रेस महासचिव सत्यवान अंभोरे, गजानन कोकाटे,शिवाजी कोकाटे, प्रभू कोकाटे ,श्रीकांत कोकाटे, प्रेमसिंग ठाकूर, विलास कोकाटे,अजय कोकाटे,दीपक जाधव ,शुभम कोकाटे, संजय ताळीकोटे,राजेश कोकाटे,सुरज कोकाटे आणि सांगवी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post