सेनगाव नगरपंचायतवर महिलाराज सेनगाव : सेनगाव, नगराध्यक्ष पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये शिवसेनेकडे नगराध्यक्ष पद आले असून नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या ज्योती देशमुख तर राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्षपदी शालिनीताई देशमुख यांची निवड करण्यात आली. सेनगाव नगरपंचायतमध्ये एकूण १७ जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तीन पक्षांना प्रत्येकी पाच जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील असे चित्र होते. त्यानुसार शिवसेनेकडे नगराध्यक्ष तर राष्ट्रवादीला उपनगराध्यक्ष पद मिळाले आहे. 

नगराध्यक्ष पदासाठी सेना, राष्ट्रवादी, आणि भाजपा या तीन पक्षांकडून तीन अर्ज सादर करण्यात आले होते. सेनगाव नगरपंचायतचा निकाल लागून तीन एक महिना होत आला. त्यामुळे नगराध्यक्ष पद नेमके कुणाकडे जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गुरुवारी (ता.१७) जिल्हाधिकारी यांच्या पत्रकानुसार ही निवड प्रक्रिया पार पडली असून शिवसेना ५, राष्ट्रवादी ५ तर काँग्रेस २ अशा १२ सदस्य एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्यात आली आहे. तर भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यात महाविकास आघाडी सरकारला यश आले आहे. 

सेनेला पहिले सव्वा वर्ष अध्यक्ष पद तर राष्ट्रवादीला दुसरे सव्वा वर्ष पद देण्यासाठी करार झाला आहे. यामध्ये शिवसेनेच्या ज्योती जगदीश देशमुख यांना पहिले सव्वा मिळाले आहे. तर उपनगराध्यक्ष पद हे राष्ट्रवादीच्या शालिनीताई देशमुख यांना मिळाले आहे. यावेळी आमदार सतोष बागर, जिल्हा प्रमुख राम कदम, रुपालीताई पाटील ,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण कार्यकर्ते उपस्थिती होते. तर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांच्या सत्कार करण्यात आला आहे तर भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात महाविकास आघाडीला यश आल्याचे पहायला मिळाले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post