प्रहार जनशक्ति पक्षाचे वतीने धार रोड वरील अनाधिकृत कचरा डेपो हटविण्याबाबत आंदोलन/जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने


परभणी:( मोहम्मद बारी जिल्हा प्रतिनिधी ):-प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने धार रोडवरील अनाधिकृत कचरा डपो हटविण्याबाबत दि २७/०८/२०२१ रोजी मा जिल्हाधिकारी परभणी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना निवेदन देऊन परभणी शहर महागनरपालिकेच्या वतीने धार रोड येथे मागील २० वर्षापासून अनाधिकृतपणे व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाशिवाय सुरु असलेला कचरा डेपो तात्काळ हटविण्यात यावा व १४ वर्षापूर्वी दि ०७/०६/२००७ रोजी परभणी तालुक्यातील गंगाखेड रोडवरील बोरखंड खु. येथे गट क्र २८ येथे कचरा डेपो व घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी दिलेल्या जागी तात्काळ हलविण्यात यावा असे निवेदन दिले होते . या निवेदनावर मा . जिल्हाधिकारी परभणी यांनी मा आयुक्त परभणी शहर महानगरपालिका यांना ४ स्मरणपत्रासह अनाधिकृत कचरा डेपो हटविण्याबान्त सूचना दिल्या परंतू यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही . कार्यवाही होत नाही असे लक्षात आल्यावर प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झाला व त्यानंतर दि २४ /०९ / २०२१ रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ परभणी यांच्या कार्यालयामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कचरा फेको आंदोलन घेण्यात आले.
धार रोड वरील अनाधिकृत कचरा डेपोमुळे धार रोडवरून प्रवास करणाऱ्या धार, मांगणगाव, साटला, दुर्डी, समसापूर , मटहराळा, सावंगी, संबर व साडेगाव अशा ९ ते १० गावांच्या नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
 प्रशासकीय पातळीवर कार्यवाही होत नाही व या प्रकरणात न्याय मिळणार नाही म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी एक महिन्यापूर्वी हरित लवाद ( ग्रीन ट्रिब्युनल ) यांच्या कोर्टात परभणी शहर महानगरपालिकेच्या धार रोडवरील अनाधिकृत कचरा डेपो तत्काळ हटवून या अनधिकृत कचरा डेपो वर कचरा टाकण्यास प्रतिबंध करावा म्हणून तक्रार दाखल केली या तक्रारीत दाखल केलेले पुरावे व इतर कागदपत्रांची सत्यता तपासणी केल्यानंतर मा. राष्ट्रीय हरित लवादाने काल दि. १५/०२/२०२२ रोजी ही तक्रार दाखल करून घेतली. या केसचा केस नं. एप्लिकेशन्स / १७/२०२२ हा आहे.
ही केस शिवलिंग बोधने यांच्या वतीने ॲड. संजय केकान व पुण्याचे वकिल ॲड. परमेश्वर खोबरे लढवत आहेत. या केसमध्ये
१  मा मुख्य सचिव, नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई
२. मा. आयुक्त परभणी शहर महानगरपालिका, परभणी
३. मा. जिल्हाधिकारी परभणी
४. मा. अध्यक्ष प्रदुषण नियंत्रण मंडळ मुंबई, ( यांच्या अंतर्गत विभागीय कार्यालय महाराष्ट्र प्रदुष नियंत्रण मंडळ , औरंगाबाद उप विभागीय महाराष्ट्र प्रदूष नियंत्रण मंडळ , परभणी )
५. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, दिल्ली
६. केंद्रीय सचिव, पर्यावरण व वन विभाग केंद्रीय मंत्रालय दिल्ली यात प्रतिवादी करण्यात आले आहे.
या शिवाय परभणी शहर महानगरपालिकेला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ ने सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी पिंगळगड नाल्यावर विद्यापीठाची जागा देण्याबाबत ठराव मंजूर केला होता असे असताना ही महानगर पालिका प्रशासन सांडपाणी व्यवस्थापन योजने साठी खाजगी जागा का विकत घेत आहे. परभणीकर जनतेकडून वसूल केलेला टॅक्स चा पैसा नागरी सुविधा देण्यावर खर्च न करता विद्यापीठाची अत्यल्प किंमतीत मिळणाऱ्या जागेला सोडून खाजगी जागा खरेदी करण्यावर करणार का असा प्रश्न या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी उपस्थित केला व लवकरच प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शहरात नागरी सुविधा नाही तर मालमत्ता कर नाही असे जनआंदोलन उभे केले जाईल असे ही बोधने म्हणाले.
या पत्रकार परिषदेला प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, ॲड. संजय केकाण, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, मिडिया प्रभारी नकुल होगे, शाम भोंग, वैभव संघई इत्यादी उपस्थित होते या पत्रकार परिषदेस मोठ्या प्रमाणावर पत्रकार बांधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post