ग्लेन मॅक्सवेल भारताचा जावई होणार?; लग्नपत्रिका व्हायरल

 ऑस्ट्रेलिया आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरचा दिग्गज खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. तो भारतीय वंशाच्या विनी रमनशी लग्न करण्याची शक्यता आहे. विनी आणि मॅक्सवेल यांची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होते. मात्र, यासंदर्भात दोघांकडून कोणतीत माहिती देण्यात आली नाही.

समोर आलेल्या माहितीनुसार २०१७ मध्ये विनी आणि मॅक्सवेल (Glenn Maxwell) हे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये दोघांचा साखरपुडादेखील झालेला होता. ते दोघे मार्च महिन्यात मेलबर्नमध्ये तामिळ रितीरिवाजानुसार लग्न करणार असल्याची बातमीदेखील व्हायरल झालेली होती.

विनी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये राहते. तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरून ती एक फार्मासिस्ट असल्याचे दिसून येत आहे. विनीचं कुटुंब चैन्नईमधील आहे. मात्र, तिचा जन्म ऑस्ट्रेलियामध्ये झाला आणि तिथेच तिचे शिक्षणही झाले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये फार्मासिस्ट शिक्षण विनीने घेतलेलं आहे.

विनीचे वडील वेंकट रमन आणि आई विजयलक्ष्मी तिच्या जन्माअगोदरच ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले होते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्यांचा विचार करता विनी आणि मॅक्सवेल तामिळ ब्राह्मणी पद्धतीने लग्न करणार आहेत. त्यामध्ये अनेक इंटरनॅशनल क्रिकेटपटूंना आमंत्रण दिलं जाणार आहे.

ग्लेल मॅक्सवेलला पूर्वीपासून भारताशी जवळीक राहिलेली आहे. तो किक्रेट सामान्याच्या निमित्ताने भारतात येत असतो. त्याचबरोबर तो आयपीएलमध्ये खूप वर्षांपासून खेळत आहे. मॅक्सवेल हा सध्या राॅयल चॅलेंजर्स टीमचा भाग आहे. त्याला टीमने आयपीएलमध्ये ११ कोटी रुपयांना रिटेन केलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post