जालना नांदेड समृध्दी महामार्गत जाणाऱ्या शेतकऱ्यावर अन्याय, जिल्हाधिकारी डॉ, ईटणकर यांच्याशी चर्चा.
 नवीन नांदेड (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाने नविन केलेल्या जालना ते नांदेड द्रुतगती समृद्धी मार्गातुन जाणाऱ्या पांगरा,तुप्पा,गुंडेगाव, बाभुळगाव,कांकाडी, गावातील शेतकऱ्यांचा  मनपा लगत असलेल्या जमीनीचा वास्तविक बाजारभाव व रेडिरेकनर चा  चार पटानुसार मिळणाऱ्या भावात  फार मोठी तफावत असल्याने  शेतकऱ्यांनी पाच गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांना भेटून आपली व्यथा सांगितली .

      महाराष्ट्र शासनाने नव्याने जालना ते नांदेड द्रुतगती समृद्धी महामार्ग घोषणा केल्यानंतर या मार्गातुन जाणाऱ्या  नांदेड तालुक्यातील या गावातील ग्रामपंचायत ठराव न घेता, शेतकऱ्यांची कोणतीही संमती  नसतांना अचानक पुर्व सुचनेनुसार शेतातातुन जाणारा रस्ता मोजणी केली, प्रत्यक्ष शेतक-यांचा हरकती वर कोणत्याही प्रकाराचा लेखी स्वरूपात उत्तरे न मिळाल्याने रस्त्याचा भुसंपादन प्रकिया चालु असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. पाच गावातील मिळणारा मोबदला  रेडिरेकनर  चार पट आहे, पंरतु वास्तविक बाजारभाव जास्त आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे,लगतच औधोगीक वसाहात असल्याने हा दर कमी होत आहे.

   कै.शंकररराव चव्हाण प्रकल्प अंतर्गत असलेल्या,तुप्पा, बाभुळगाव,कांकाडी,गुंडेगाव ,पांगरा या पाच गावांतील जमीनी सुपिक असुन बारामहिने ही बहुपीके जमीन रस्त्या मध्ये जात असल्याने शेतकऱ्यांचे ऊपजिवीकेचे साधन कायमस्वरूपी संपुष्टात येत आहे,व या सोबत मजुरदाराचा प्रश्न उद्भभवत आहे,भुसंपादन प्रकिया ही  जलद गतीने होत असल्याने पाचही गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांच्यी १५ फेब्रुवारी रोजी भेट घेतली व चर्चा केली.
         यावेळी दासराव पाटील हंबर्डे,अशोकराव पाटील मोरे,ऋषी पाटील मस्के,मधुकर पाटील मस्के, गजानन हंबर्डे, सुर्यभान मोरे, सुर्यभान कुरे,शेख मस्जिद,तुळशिराम गिरे, बालाजी हंबर्डे,गणपत मिसे,माधव कदम, व शेतक-यांनी भेट घेऊन चर्चा केली.

Post a Comment

Previous Post Next Post