वसमत न.प. प्रशासनाचे बॅनर बाजी कडे दुर्लक्ष प्रतिनिधी मोईन कादरी
वसमत शहरातील नागरीकांना विविध सेवा व शहर विकासाचे कामे न .प. द्वारे होत आहेत. 
त्याच प्रमाणे विविध  कर वसुलीचे कार्य ही प्रशासनाला महसुल मिळावा या करिता कर वसुली विभाग करत असतो. 
  बॅनर लावण्या करिता मागील काही दिवसा पूर्वी कर पावती घेतल्या शिवाय व  बॅनर परवाणा क्रमांक प्रिंट केल्याशिवाय लावता येणार नाही अन्यथा सदर बॅनर जप्त केल्या जात असे असा नियम काही दिवस शहरात सुरु होता प्रशासनाला त्याचा कर ही मिळत होता. परंतू आता प्रशासनाला टॅक्स ची नसल्या मुळे किंवा संबधीत कर्मचाऱ्याच्या दुर्लक्षा मुळे सामान्य दादा भाऊ च्या , अमुक अमुक मित्र मंडळाच्या , देशी सप्लाय करणाऱ्या , अवैध धंदे करणाऱ्या शेर की ताकत असे स्लोगण टाकुण वाढदिवसाचे बैनर चा कहर झाला आहे प्रत्येक गल्लीत दादा निर्माण झाले आहेत - सर्वांना वाढदिवस साजरा करण्याचा बॅनर लावण्याचा जन्म सिद्ध अधिकार आहे. परंतू प्रशासनाच्या नियमाचे पालन करणे व संबधीत कर्मचारी , अधिकारी साहेबांनी सदर नियमांची अमलबजावणी करूण सर्व नागरीकांना शिस्त लावणे गरजेचे आहे . अशी चर्चा जनतेत होत आहे. 
पत्रकार मोईन कादरी

Post a Comment

Previous Post Next Post