अवैध पिस्टल बाळगणान्यास विमानतळ पोलिसांनी केले गजाआडानांदेड शहरातील गुन्हेगांरावर वचक निर्माण करून गुन्हेगारी करणारे व अवैध शस्त्रा बाळगणारे गुन्हेगांराना गजाआड करण्याचे आदेश मा. श्री प्रमोद शेवाळे, पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री निलेश मोरे, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री विजय कबाडे, अपर पोलीस अधिक्षक भोकर, मा. श्री चंद्रसेन देशमुख, उप विभागयीय पोलीस अधिकारी नांदेड शहर यांनी पोनि पोस्टे विमानतळ मा. श्री संजय ननवरे यांना दिले होते. पोनि पोस्टे विमानतळ यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 23.02.2022 रोजी चे 11.48 वा. चे सुमारास गुन्हेशोध पथकातील सपोनि श्री बाळु गीते, पोह / दारासिंग राठोड, पोकॉ / बंडु कलंदर, दत्तात्रय गंगावरे, नागरगोजे चालक साई सोनसळे असे पेट्रोलींग करीता खांना केले. गुन्हे शोध पथकाला गुप्त बातमी दारांकुडन माहिती मिळाली की एक इसम चंद्रलोक हॉटेल परिसरात कमरेला पिस्टल बाळगुन फिरत आहे. तेंव्हा गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार तेथे गेले असता त्यांना पाहुन कावरा बावरा होवुन पळुन जाण्याच्या तयारीत असतांना त्यास पकडुन पंचा समक्ष अंगझडती घेतली असता एक लोखंडी पिस्टल किंमती अंदाजे 15,000 /- रूपयाचे ताब्यात मिळाले. त्याचे नाव गाव विचारता त्यांने त्याचे नाव ऋषीकेश पि. आनंदराव मोरे, वय 26 वर्षे व्यवसाय पानटपरी रा. गांधीनगर नांदेड असे सांगीतले. तेंव्हा त्यास अधिक विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांने सांगीतले की सदरची पिस्टल ही प्रविण उर्फ बाळु खोबरे, रा. गांधीनगर यांची असुन त्यास अनिल पि. रंगराव भांडवले यांनी दिली होती. ती पिस्टल ही प्रविण उर्फ बाळु खोबरे रा. गांधीनगर यांनी माझेकडे ठेवण्यास दिली होती असे सांगीतले. सदर तीन आरोपी विरूध्द पोस्टे विमानळ गुरन 65 / 2022 कलम 3 / 25 भारतीय हत्यार कायदा सह कलम 34 भादवि कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक आरोपी अटक असुन दोन फरार आहेत. अशा प्रकारे पोस्टे विमानतळचे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी चांगली कामगीरी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post