स्टिंग ऑपरेशन; आधारकार्ड विक्रीचे धक्कादायक सत्य समोर

 नागपूर शहरातील जरीपटका भागात भंगाराच्या दुकानात २० रुपयांमध्ये आधारकार्ड मिळत असल्याची माहिती मिळताच, स्थानिक आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी स्टिंग ऑपरेशनद्वारे आधारकार्डचे सत्य समोर आणले आहे. यावर कारवाई करत पोलिसांनी या भंगार दुकानातून १०० पेक्षा जास्त आधारकार्ड जप्त केली आहेत.

मेकोसाबाग परिसरात कचरा वेचणाऱ्या एका व्यक्तीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आधार कार्डाचे एक बंडल सापडले होते. त्याने ते बंडल परिसरातील एका भंगार दुकानातील मालकाच्या स्वाधीन केले. आधारकार्डावर असलेल्या मोबाईल नंबरवर फोन करून आधार कार्ड २० रुपयांमध्ये विकण्यात येत होते. तसेच आधारकार्डची मागणी करणाऱ्यांनाही पैसे घेऊन आधार कार्ड उपलब्ध करून दिले जात असल्याचे, आम आदमी पक्षाच्या नेत्यांना समजले होते.

याप्रकरणी माहितीची खातरजमा करून, स्थानिक आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी स्टिंग ऑपरेशनचा सापळा रचला. याद्वारे आधारकार्ड विक्रीचे हे धक्कादायक सत्य समोर आले. यानंतर जरीपटका पोलिसांनी कारवाई करत या दुकानातून १०० पेक्षा जास्त आधारकार्ड जप्त केली आहेत. या प्रकरणात सहभागी असलेल्यांची पोलीस चौकशी करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post