महिल सक्षमीकरणास बचत गट महत्वपूर्ण - डॉ. सिद्धार्थ भालेराव
 नालंदा महिला बचत गटाच्या मिनी ट्रॅक्टरचे झाले लोकार्पण 
गंगाखेड :मोहम्मद  बारो  ;- महिलांच्या सबलीकरण सक्षमीकरण व सर्वांगीण विकासासाठी स्वयंसहायता बचत गटाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन नालंदा बचत गटाच्या मिनी ट्रॅक्टर लोकार्पण प्रसंगी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सिद्धार्थ भालेराव यांनी शनिवारी येथे केले.

        समाजकल्याण विभाग परभणी व गंगाखेड नगर पालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील डॉ.आंबेडकर नगर येथील नालंदा महिला बचत गटास मिनी ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. याचा लोकार्पण सोहळा शनिवारी (५ रोजी) दुपारी ३ वाजता डॉ सिद्धार्थ भालेराव यांचे हस्ते झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेविका डॉ. प्रतिभा भालेराव माजी नगरसेविका कौशल्याबाई साळवे व प्रभाग क्रमांक २ च्या नगरसेविका स्मिता रणधीरराजे भालेराव या होत्या. ॲड. महावीरराजे भालेराव, पत्रकार प्रमोद साळवे व चिंतामणी साळवे, एन.के.साळवे, नागनाथ साळवे यांचीही यावेळी उपस्थिती होती. याप्रसंगी पुढे बोलताना डॉ. सिद्धार्थ भालेराव म्हणाले की, मागासवर्गीय समाजातील स्वयंसहाय्यता बचत गटांच्या महिला सदस्यांनी एकजुटीने बचत गटाचे काम वाढवून स्वतःचा व समाजातील महिलांच्या घटकांचा सर्वांगीण विकास करून घेणे महत्त्वाचे आहे. शहरातील डॉ.आंबेडकर नगर येथील नालंदा महिला बचत गटाचे कार्य उल्लेखनीय असून या कार्याची पोचपावती म्हणूनच शासनाने या बचत गटास मिनी ट्रॅक्टररूपी मदत केली आहे. नालंदा बचत गटाचा आदर्श अन्य महिला बचत गटांनीही घ्यावा असे आवाहनही यावेळी डॉ.भालेराव यांनी केले. शहरातील महिला बचत गटांनी नालंदा महिला बचत गटाचा आदर्श घेऊन पुढे येऊन सामाजिक कार्यात वाटा उचलून महिलांचा सर्वांगीण विकास साधावा असे आवाहन यावेळी नगर पालिकेच्या प्रकल्प अधिकारी अंजना बीडगर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार पत्रकार प्रमोद साळवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नालंदा महिला बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री नागनाथ साळवे, सचिव गंगाबाई भास्कर डाके, उपाध्यक्षा करुणा नागनाथ साळवे, सदस्या कविता अनंता साळवे, शिल्पा बाबासाहेब साळवे, कौशल्याबाई सतीश साळवे, रमा दिपक साळवे, रमा शेषराव गायकवाड, मीना उध्दव डाके, आशा गौतम खंदारे आदींनी परिश्रम

Post a Comment

Previous Post Next Post