शहरातील विविध शैक्षणिक संकुलातील विकास कामांचा आज भूमिपूजन व लोकार्पण सोहळा

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, वैदकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची उपस्थिती.
नांदेड: जिल्ह्यात  व शहरात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून विविध विकास कामांचा धडाका सुरू असून  त्याचाच एक भाग म्हणून उद्या दि .28 फेब्रुवारी रोजी शहरातील विविध शैक्षणिक संकुलातील विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे.या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री 
अशोकराव चव्हाण ,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत ,वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास निधी येत आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या दृष्टीकोनातून साकारलेल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड या महाविद्यालयीन इमारतीचे भूमिपूजन, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात शंभर प्रवेश‌क्षमता असलेले  मुलींची वसतिगृह  इमारत  भुमिपूजन , शासकीय बीएससी नर्सिंग  महाविद्यालया चा शुभारंभ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात डॉक्टर शंकरराव चव्हाण अभ्यासिका संकुलाचे भुमिपूजन ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वस्तीगृह धनगरवाडी नांदेड  200 क्षमता  इमारतीचे भूमिपूजन,  डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी येथे टप्पा 2 अंतर्गत मुख्य प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील प्रशासकीय इमारत व ग्रंथालय इमारतीचे आधुनिकीकरण सौंदर्यीकरण, आदि कामाचा शुभारंभ २८ फेब्रुवारी रोजी   सकाळी १० वाजता  डॉ.शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेज परिसर विष्णुपुरी येथे करण्यात येणार आहे.त्यासोबतच यावर्षी सुरू झालेल्या नर्सिंग महाविद्यालयाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
 या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आ. अमर राजूरकर आ.मोहन हंबर्डे आ. बालाजी कल्याणकर माजी पालकमंत्री डी.पी.सावंत ,जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर ,महापौर जयश्री पावडे , काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर , राष्ट्रवादीचे जिलहाध्यक्ष हरिहर भोसीकर,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद पाटील बोढारकर यांची उपस्थिती राहणार आहे ,या कार्यक्रमास काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post