जिजाऊ सृष्टी सिडको येथे कै.ईरबाजी हंबर्डे यांच्या नावाने प्रवेशद्वाराची लवकरच उभारणी.. नविन नांदेड.सिडको सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत नगरसेविका सौ इंदुबाई शिवाजी पाटील घोगरे यांच्या स्वेच्छा निधी अंतर्गत चार लक्ष रुपयांचा निधीतून कै.ईरबाजी हंबर्डे यांच्या नावाने प्रवेशद्वाराची लवकरच  उभारणी करण्यात येणार असून या वर्षीच्या भव्य मिरवणूक मध्ये आठ फुटी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळासह  पारंपरिक वाघंवृदं यांच्या समावेश असुन हडको ते सिडको संभाजी चौक, गुरूवार बाजार शंकरनगर मार्ग जिजाऊ सृष्टी येथे मिरवणूक काढण्यात येणार आहे.

    सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्यी बैठक जिजाऊ सृष्टी येथे ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी जिजाऊ सृष्टी येथे सायंकाळी समितीचे अध्यक्ष दिलीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली,या वेळी भाजपा नगरसेविका सौ इंदुबाई शिवाजी पाटील घोगरे यांच्या स्वेच्छा निधी अंतर्गत चार लक्ष रुपयांचा निधी तुन सामाजिक कार्य मध्ये सहभागी असलेले व्यक्तिमत्त्व कै.ईरबाजी हंबर्डे यांच्या नावाने जिजाऊ सृष्टी येथे प्रवेशद्वारासाठी निधीची  घोषणा नगरसेविका सौ.इंदुबाई घोगरे यांनी केली असून लवकरच  प्रवेशद्वार उभारण्यात येणार असल्याचे सांगितले ,या वर्षी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या १९ फेब्रुवारीचा मिरवणूक मध्ये प्रथमच आठ फुटी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळायाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.     शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून सहभागी होणा-या पदाधिकारी व नागरीकांना मास्क व सेनिटायझर चे वाटप करण्यात येणार आहे तर पारंपारिक वाघवृंद  असलेल्या बँड पथकाचा समावेश राहणार आहे.
   या समितीच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले आहेत.या बैठकीस सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्ये स्वागत अध्यक्ष संग्राम मोरे  पदाधिकारी व संजय पाटील घोगरे,  जयवंत काळें, त्र्यंबक कदम, साहेबराव गाढे,संकेत पाटील,मंगेश कदम, बापुसाहेब पाटील,राजु लांडगे,शाम जाधव ,संग्राम मोरे यांच्यासह  विविध समित्या चे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post