नरसीत अज्ञात चोरट्यांनी मुख्य रस्त्यावरील ज्वेलर्स दुकान फोडले चोरटे सि.सि.टिव्ही कॅमेर्‍यात कैद
नरसी/ नायगाव तालुका प्रतिनिधी (शेख मोहीयोद्दीन)

            नरसीत चोरटे सक्रीय झाले असुन मंगळवारी रात्री मुखेड - नरसी रोडवरील न्यु बालाजी सोन्या चांदीच्या दुकानाचे शटरचे कुलुप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून काउन्टर चे लॉक फोडून त्यांच्यातील सोन्या चांदिचे दागिने व गल्यातील रोख सात हजार रूपये असे ३९ हजारांवर डला मारुन चोरटे फरार झाले असून घरमालकाच्या सतर्कतेमुळे अन्य दुकाने फोडण्याचा प्रयत्न फसला असुन पोलिस चौकीच्या हाकेच्या अंतरावर चोरट्यांनी धाडसी चोरी केल्यामुळे शहरातील व्यापारी भयभीत झाले आहे. दुकान मालक चंद्रशेखर गोपाळराव पांचाळ यानी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर कलम ४५७,/३८० भा .द .वी. प्रमाणे रामतिर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

              नरसी हे चौरस्त्याचे ठिकाण असुन येथे मोठी बाजार पेठ असुन मागिल दोन महिन्यांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी घरे व दुकाने फोडून रोख रखमेसह सोन्या चांदीचे दागिणे व दुकांनातील वस्तू चोरून नेल्याच्या घटना घडल्या परंतु त्या चो-याचा अर्धवट तपास करण्यात पोलिसांना यश आले असले तरी बाकीचा तपास कधी लागणार याकडे नरसीकरांचे लक्ष लागले.

         दि.२ फेब्रुवारी रोजी नरसी शहरातील मुखेड-नरसी मुख्य रस्त्यावरील श्रीनिवास ज्वेलर्स चे शटर वाकवुन दुकानात प्रवेश करुन दुकानातिल काउन्टर फोडले परंतु हताला काही लागले नसल्याने बाजूला असलेल्या न्यु बालाजी ज्वेलर्स चे शटर वाकवुन दुकाना मध्ये प्रवेश करत काऊंटर चे लॉक तुडुन त्यातील सोन्याची पोत व मणीमंगसुत्रे चार ग्राम चांदीची चैन दोनशे ग्राम व सात हजार रुपये रोख रक्कम अशा एकोणचाळीस हजारांचा ऐवज नेल्याची फिर्याद दुकान मालक चंद्रशेखर गोपाळराव पांचाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर कलम ४५७,/३८० भादवी प्रमाणे रामतिर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी अन्य दुकाने फोडली असती परंतु दुकानाचे मालक शिंदे हे जागे होऊन पोलिसांना व बाजुच्या नागरिकांनी फोन लावून बोलवुन घेतले परंतु तोपर्यंत चोरटे पसार
झाले होते. घरमालकाच्या सतर्कतेमुळे अन्य दुकाने फोडण्याचा प्रयत्न फसला आहे.नरसीत चोरटे सक्रीय झाले असल्याने नागरीकात भिती वातावरण पसरले आहे .

Post a Comment

Previous Post Next Post