प्रार्थना बेहरेचे मुंबईतील घर आहे खूपच आलिशान, घराच्या बाल्कनीतून दिसतो निळाशार समुद्र

 मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

प्रार्थना सोशल मीडियावर सक्रिय असून ती या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र या व्हिडीओत ती नसून तिच्या आलिशान घराच्या बाल्कनीतून सुंदर व्ह्यूची झलक पहायला मिळते आहे.

प्रार्थना बेहरे हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. या दोन्ही व्हिडीओत ती बाल्कनीतून बाहेरचा नजारा दाखवताना दिसते आहे. तिच्या बाल्कनीतून समुद्र पाहायला मिळतो आहे. या व्हिडीओत तिने सकाळ आणि संध्याकाळचा व्ह्यू दाखवला आहे आणि त्या दृश्याचा आनंद प्रार्थना बेहरे लुटते आहे.

Post a Comment

Previous Post Next Post