करोना काळात भाजप हि , देशाचे तुकडे तुकडे करणारी गैंग बनली , उत्तर भारतीय लोकांची व महाराष्ट्र राज्याची बदनामी करणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदिनी माफी मागावी- सुहास पंडित
परभणी/ मोहम्मद बारी /प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केलेल्या भाषणात महाराष्ट्रातल्या १२ कोटी जनतेवर करोना पसरवल्याचे खोटे आरोप करून छत्रपती शिवाजी महाराज , फुले शाहू आंबेडकर याच्या महाराष्ट्राचा अवमान केला आहे . या बद्दल त्यांनी माफी मागावी. तसेच करोना काळात मनमानी पद्धतीने लॉक डाऊन करून , नमस्ते ट्रम्प करून आम जनता, कामगार व उत्तर भारतीय लोकांचे तीळ तीळ तडपवून KTKTIK, ७००  शेतकर्याच्या हत्या वर चूप राहून भाजप हि , तुकडे तुकडे करणारी गैंग बनली आहे.  

उत्तर भारतीयांनी कोरोना पसरवला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार, दुर्दैवी व आपल्याच देशाच्या नागरिकांचा अपमान करणारे आहे.संसद मध्ये भाषण करून फक्त कॉंग्रेस ने काय केले हेच होते . भाजप जेव्हा विपक्ष होते तेव्हा हि तेच आणि ८ वर्षापासून सरकार चालवत आहेत तरीही कॉंग्रेस पक्षालाच बोलत आहेत . देशाला सांगा मोदिजी जनतेने आपल्याला उद्योगपतीची दलाली करायाला आणि देशाला विकायला पाठविले आहे का?   हा आमचा सवाल आहे.

14 कोटी लोक बेरोजगार झाले  आहेत CMIE च्या रेपोर्ट नुसार.महागाई वाढली आहे .शेतकरी आत्महत्या व शेतकी नुकसानी वाढली आहे असे  अनेक प्रश्न असताना देशाचे मुख्य मुद्दे सोडून वायफळ चर्चा करत खोटे बोलून लोकांची दिशाभूल करत आहेत.

कोरोना महामारीच्या गंभीर संकटाचा सामना देश करत असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने झोपा काढल्या. लहरी व मनमानी पद्धतीने अचानक लॉकडाऊन लावून करोडो लोकांना मोठ्या संकटात ढकलले. या संकट काळात काँग्रेस पक्षाने मा. सोनियाजी गांधी यांच्या निर्देशानुसार मुंबईतील उत्तर भारतीय बांधवांना त्यांच्या गृहराज्यात पाठवण्याची व्यवस्था केली. त्यांच्यासाठी अन्नधान्य, औषधे, जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठवली. वाहतुकीची सुविधा नसतानाही रेल्वे, बसच्या माध्यमातून आपल्या राज्यात जाऊ पाहणाऱ्या लाखो परप्रांतीय नागरिकांना काँग्रेसने सुविधा पुरवली व त्यांच्या राज्यात पाठवले. देशाचे पंतप्रधान या नात्याने संकटकाळात नागरिकांना मदत करणे त्यांचे कर्तव्य असताना त्यांना वाऱ्यावर सोडून दिले. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना नमस्ते करताना किंवा मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी लॉकडाऊन केला नाही तेव्हा कोरोना पसरला नाही. ट्रेनही काँग्रेसने चालवली?  पियुष गोयल थाळ्या वाजवत होते का?. गुजरातमधून गेलेले मजूर कोरोना पसरवत नव्हते. फक्त महाराष्ट्रातील उत्तर भारतीय मजूरांनी कोरोना पसरवला का? . मोदी सरकारने कोट्यवधी कामगारांना वाऱ्यावर सोडले म्हणून काँग्रेसने गरीब कामगारांच्या तिकिटांसाठी पैसे दिले. असहाय्यांना मदत करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. ही छत्रपती शिवाजी महाराज , फुले शाहू आंबेडकरशिकवण आहे. म्हणून काँग्रेसने केलेल्या कर्तव्य पालनाचा आम्हाला अभिमान आहे

Post a Comment

Previous Post Next Post