पक्षवाढीसाठी एक तास' राष्ट्रवादीच्या उपक्रमाला प्रतिसाद
परभणी/ मोहम्मद बारी प्रतिनिधी 
राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महानगर जिल्हा शाखेच्या वतीने प्रसार व प्रचार मोहिम हाती घेण्यात आली आहे.
       राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'पक्ष वाढीसाठी एक तास: या संकल्पनेतून राष्ट्रवादी विचाराचे धन, पुरोगामी विचार कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे या दृष्टीकोनातून दिलेल्या निर्देशानुसार महानगर शाखेच्या वतीने महिन्याच्या पहिल्या शनिवारी म्हणजे आज महानगरपालिका हद्दीतील प्रभाक क्रमांक 16 मधील ज्ञानेश्‍वर नगर (साखला प्लॉट) या ठिकाणी मोहिम सुरु करण्यात आली. महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी सुरु केलेल्या या मोहिमेतून या प्रभागात सर्वसामान्य नागरीकांच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. त्यातून राष्ट्रवादी विचारांचा प्रसार व प्रचार करण्यात आला. या बैठकांना मुनीर भाई, विखे पाटील, शेख इकबाल, विश्‍वजित वाघमारे, नासेर भाई, अनिल कानडे, सचिन सोनटक्के, गौतम उगले, नंदू राऊत, गजानन बारवे आदी उपस्थित होते. विधानसभा अध्यक्ष शंकर भागवत व रामभाऊ भंवर यांनी या  उपक्रमाचे आयोजन केले होते.

Post a Comment

Previous Post Next Post