आलियाला किस करून चर्चेत आलेला शांतनू माहेश्वरी आहे तरी कोण?शांतनू माहेश्वरी आणि आलिया भट्ट दोघेही सध्या चर्चेत आहेत. कारण होतं- किसींग सीनचं. गंगुबाई काठियावाडी या चित्रपटात दोघांची भूमिका आहेत. हे दोघे कपलच्या भूमिकेत दिसणार आहेत. आलिया भट्टचा चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ चर्चेत आहे. यामध्ये आलिया आणि शांतनू यांच्यातील रोमान्स मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. नुकताच दोघांचे जब सैया हे गंगुबाई काठियावाडी चित्रपटातील गाणे रिलीज झाले आहे. दोघांचाही रोमॅँटिक अंदाज गाण्यात दिसत आहे. तुम्हाला माहितीये का, शांतनू माहेश्वरी कोण आहे

शांतनूविषयी आपण जाणून घेणार आहोत. आलियासोबत भूमिका करण्यासाठी त्याची निवड करण्यात आली, हेच त्यांचं खास वैशिष्ट्य आहे. शांतनू आणि आलियाला आपल्या चित्रपटामध्ये दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी स्थान दिले आङे. कारण या दोघांची परफेक्ट जोडी आहे.

कोण आहे शांतनू?

शांतनू एक तरुण कलाकार आहे. शांतनू ३० वर्षांचा आहे. इतक्या कमी वयात त्याने आपल्या टॅलेंटच्या जोरावर ओळख बनवण्यात यश मिळवलंय.

तो एक अभिनेता, कोरिओग्राफर, डान्सर आणि होस्ट आहे. आपल्या करिअरची सुरुवात त्याने चॅनेल व्हीच्या शो दिल दोस्ती डान्समधून (२०१७) केली होती. तो ‘खतरों के खिलाडी आठवया सीझनचा विजेतादेखील होता.

शांतनूकडे स्नीकर्स आहेत. त्याच्याकडे खूप सारे शूज आहेत. डान्स स्टेप्स करताना हे शूज आपोआप लक्ष वेधून घेतात. यावरून दिसतं की, त्याला स्नीकर्स किती आवडतात.

शांतनू दिसायला मासूम दिसतो. पण, आश्चर्य वाटतं की, मासूम तरुण ‘खतरों के खिलाडी ८’ चा विजेता कसा झाला? तो विजेता ठरलाय तो आपल्या हिमतीवर. म्हणूनचं तर त्याची फॅन फॉलोईंगची लांबलचक यादी आहे.

लॉन्ग हेअरस्टाईल

शांतनू आपल्या लांब केसांमुळेही ओळखला जातो. त्यामुळेच त्याचा लुकदेखील दमदार आहे. त्याचे केस कुरळे असल्यामुळे त्याची क्यूटनेस आणखी वाढली आहे.

देसी मन

स्टायलिश शांतनूचा अंदाज एकदम देसी आहे. हीच गोष्ट त्याला खास बनवते. शांतनू स्ट्रीट स्टाईलमध्ये विश्वास करतो. त्य़ाची ही हेअर स्टाईल फॉलो करणेदेखील सोपे आहे.

शांतनूच्या इन्स्टाग्रामवर खूप सारे फोटो पाहायला मिळतात. शांतनूच्या या फोटोजना पाहून तुम्ही म्हणाल की, शांतनू साध्या ड्रेसमध्ये दिसतो. पण, लूक मात्र स्टायलिश असतो.

फोटोग्राफीची आवड

शांतनूला फोटोग्राफीची आवड आहे. तो फोटो शेअर करतो. यावरून दिसते की, तो एक उत्तम अभिनेता आहे.

इंटिमेट सीन हटवण्यात आले?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात शांतनू- आलियामध्ये इंटीमेट सीन होते. या दोघांच्यात किसिंग सीन शूट करण्यात आलं होतं. पण, दिगदर्शकाने हा सीन हटवण्याचा निर्णय घेतला. चित्रपटामध्ये आलिया-शांतनू यांच्यात लव्ह सीन होते. पण, नंतर ते हटवण्यात आले. हे सीन चित्रपटात दाखवण्यात येणार नाही.

Post a Comment

Previous Post Next Post