स्वारातीम’ विद्यापीठामध्ये संत रविदास महाराज यांची जयंती साजरी


 


नवीन नांदेड (प्रतिनिधी):स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि.१६ फेब्रुवारी रोजी (तिथीनुसार) संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. ज्ञानोबा मुढे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सिनेट सदस्य उद्धव हंबर्डे, नारायण गोरे, मारोती वाघमारे, रामदास खोकले, संदिप एडके, संभा कांबळे, बबन हिंगे यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Post a Comment

Previous Post Next Post