सोफा सेटमध्ये मृतदेह आढळलेल्या विवाहितेच्या मृत्युचं गूढ उकलणार! संशयित आरोपी विवाहितेचा मित्र?दावडी गावातील शिवशक्ती नगर येथील ओम रेसिडेन्सी येथे मंगळवारी रात्री सुप्रिया शिंदे यांचा मृतदेह घरातील सोफा-कम-बेडमध्ये आढळल्यानंतर मानपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता

  मुंबई : डोंबिवलीतील महिलेेच्या हत्या प्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे.

  मृतक सुप्रिया शिंदे यांच्या पतिला पोलिसांनी संशयित व्यक्तीचा फोटो दाखवल्यानंतर त्यांनी त्याला ओळखत असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे, 'तो आमच्या घरापासून काही अंतरावरच राहतो आणि सुप्रिया हरवल्याची तक्रार देण्यासाठी तो माझ्यासोबत पोलिस स्टेशनलाही आला होता" असं त्यांनी सांगितलं.

  डोंबिवलीच्या दावडी गावातील शिवशक्ती नगरमध्ये 33 वर्षीय सुप्रिया शिंदे यांची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. मंगळवार 15 फेब्रुवारीला दिवसभर बेपत्ता असलेल्या सुप्रिया यांचा मृतदेह राहत्या घरातील सोफा सेटमध्ये आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी तपास सुरू असून पोलिसांनी गुरुवारी संशयित व्यक्तीचा फोटो दाखवल्यानंतर सुप्रिया शिंदे यांचे पती चकित झाले. "हा माणूस माझ्या पत्नीला ओळखतो, याची मला कल्पनाही नव्हती. तो आमच्या घरापासून काही अंतरावरच राहतो. सुप्रिया हरवल्याची तक्रार देण्यासाठी तो माझ्यासोबत पोलिस स्टेशनलाही आला होता" अशी महिती पोलिसांना दिली.

  हे सुद्धा वाचा


  काय आहे प्रकरण?

  दावडी गावातील शिवशक्ती नगर येथील ओम रेसिडेन्सी येथे मंगळवारी रात्री सुप्रिया शिंदे यांचा मृतदेह घरातील सोफा-कम-बेडमध्ये आढळल्यानंतर मानपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. टायने गळा आवळून त्यांचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस रक्त होते. घरात कोणी जबरदस्ती घुसल्याची चिन्हं नसल्यामुळे सुप्रिया यांच्या संमतीनेच मारेकरी आत आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post