मोफत फ्लाइट तिकीट बुकिंग ऑफर: एअर इंडियाने दिला हा इशारा

 


एअर इंडिया टाटा सन्सच्या ताब्यात गेल्यापासून काही लोक सामान्य माणसांचा टाटावर असलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नुकतेच एअर इंडियाने अशाच एका दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवर नोटीस जारी करून नागरिकांना सतर्कतेता इशारा दिला आहे. एअर इंडियाने म्हटले आहे की त्यांच्याकडून कोणतीही मोफत तिकीट ऑफर दिली जात नाही. तसेच. नावाच्या कंपनीने एअर इंडियासाठी कोणतेही अॅप विकसित केलेले नाही.

एअर इंडियाने नोटीसमध्ये म्हटले आहे की,  कंपनी प्रिंट आणि डिजिटल मीडियाद्वारे एक मोहीम चालवत आहे. ज्यामध्ये या कंपनीने एअर इंडियासाठी अॅपचा प्रोटोटाइप विकसित केल्याचा दावा केला जात आहे. त्याचबरोबर जाहिरातीसोबत एक QR कोड देखील देण्यात आला आहे. ज्याद्वारे प्रोटोटाइप अॅप डाउनलोड करण्याची लिंक मिळतेे. त्यामुळे एअर इंडियाने म्हटले आहे की, जर तुम्हीही अशी जाहिरात पाहिली असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका.

काय आहे ही जाहिरातीत

Builder.ai कंपनीच्या जाहिरातीत असा दावा करण्यात आला आहे की, जे हे अॅप डाउनलोड करतील त्यांना एअर इंडियाचे मोफत तिकीट जिंकण्याची संधी मिळेल. त्यावर एअर इंडियाने स्पष्ट केले आहे की, त्यांच्याकडून कोणतेही मोफत तिकीट दिले जात नाही. म्हणजेच ने केलेला दावा पूर्णपणे खोटा आहे आणि जर तुम्ही यावर विश्वास ठेवून काही कृती केली तर तुमची फसवणूक देखील होऊ शकते. या अॅपवर एअर इंडियाचा लोगो आहे, परंतु एअर इंडियाने तो विकसित करण्यास सांगितले नाही. त्यामुळे या अॅपच्या माध्यमातून कोणाचीही फसवणूक झाल्यास त्याला कंपनी जबाबदार राहणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post