विजय सेतुपती, समंथा, नयनताराचा रॉमकॉमसाऊथची सुपरस्टार अभिनेत्री समंथा रूथ प्रभू आजकाल चर्चेत असते. कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे तर कधी तिच्या चित्रपट, आयटम साँगमुळे. सध्या समंथाचा फोकस तिच्या करिअरवर असलेला दिसतो. ती झपाट्याने तिचे प्रोजेक्ट पूर्ण करत असते आणि मग एखाद्या ठिकाणी पर्यटनाला निघून जाते. सध्या समंथा चर्चेत आलीय तिच्या नव्या चित्रपटामुळे. समंथाचा आणखी एक दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिच्यासोबतचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या दोघी आगामी ‘काथु वकुला रेंडू कधल’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात एकत्र काम करत आहेत. यात दोघींचा नायक आहे साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती. हा फोटो याच चित्रपटाच्या सेटवरील आहे. नयनतारा सोशल मीडियात सक्रिय नाहीय, पण तिची फॅन फॉलोविंग काही कमी नाही. त्यामुळेच दोन्ही अभिनेत्रींच्या चाहत्यांच्या या फोटोवर उड्या पडल्या आहेत. हा चित्रपट 28 एप्रिलला रीलिज होत आहे. विजय सेतुपती आणि समंथा या निमित्ताने प्रथमच एकत्र काम करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post