नरसी येथे फळ विक्रेत्यावर चाकूने हल्ला

नरसी/नायगाव तालुका प्रतिनिधी (मोहियोद्दिन शेख) : थोडेच अंगुर दिल्याच्या कारणावरुन चाकुने हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केल्याची घटना 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घटली.

नरसी येथील फळविक्रेता तोफीक हमीद बागवान हा बसस्थानकासमोर गाड्यावर अंगुर विक्री करीत होता.
सायंकाळी गणेश कांबळे नावाच्या तरुणाने फळ विक्रेत्यास खाण्यासाठी अंगुर मागितले ,त्याने अंगुर दिल्यानंतर तु ऐवढेच अंगुर देतोस का म्हणुन अंगुर फेकुन निघुन गेला ,थोड्यावेळाने परत आल्यानंतर गणेश कांबळे यांने चाकुने फळविक्रेत्यावर हल्ला केल्यानंतर 
त्याच्यासोबत असलेल्या विजय कांबळे व दत्ता वडजे याने थापड बुक्या मारहाण करुन जखमी केले. या प्रकरणी तोफीक हमीद बागवान यांने दिलेल्या फिर्यादीवर रामतीर्थ पोलीसांनी दोघाविरुध गुन्हा कलम 326,324,34 दोघाविरुद्ध गुन्हा दाखल केला असुन प्रकरणाचा पुढील तपास सपोनि जाधव हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post