भोकर शहरात पल्स पोलीओ लसीकरण मोहीम संपन्न

 
भोकर :- राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहीम दि. २७ फेब्रुवारी रोजी भोकर शहरात ग्रामीण रुग्णालय भोकर तर्फे व डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली २५ बुथ ठिकाणी, ३ ट्राझिंट टिम व १ मोबाईल टिम करून मोहीम राबविण्यात  आली. 
वय वर्षे ० ते ५ वर्षे वयोगटातील अपेक्षित बालके लाभार्थी ४५८८ पैकी ४२१६ (९१.८९ टक्के), ट्राझिंट टिम व मोबाईल टिम कडून १२० बालके असे एकुण ४३३६ बालकांना पोलीओ लस पाजविण्यात आली. 
डॉ सुनील पल्लेवाड जिल्हा स्तरीय अधिकारी यांनी काहि बुथ ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व काही बुथवर पोलीओ लस पाजविली. 

ग्रामीण रुग्णालय भोकर येथील डॉ.सागर रेड्डी, डॉ अनंत चव्हाण, डॉ व्यंकटेश टाकळकर, डॉ अविनाश गुंडाळे, डॉ.मुद्दशीर, डॉ थोरवट,  डॉ ज्योती यन्नावार, डॉ अपर्णा जोशी, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य सहाय्यक, गंगामोहन शिंदे, संदिप ठाकूर, गिरी रावलोड औषध निर्माण अधिकारी, पांडुरंग तम्मलवाड, नामदेव कंधारे आरोग्य कर्मचारी,सुरेश डुम्मलवाड, श्रीमती नवघडे परिसेविका, श्रीमती भवरे, निलोफर पठाण, दिपके, सुनिता ताटेवाड, बोड्डेवाड, संगिता महादळे अधिपरीचारीका, श्रीमती सरस्वती दिवटे, मुक्ता गुट्टे, संगिता पंदीलवाड आरोग्य सेविका, भिसे,सुर्वणकार, भोळे,माया आडे, गजानन, बबलू चरण, हत्तीरोग कर्मचारी विठ्ठल मोरे, रामराम जाधव,गणेश गोदाम, इंदल चव्हाण, राजू चव्हाण, रविंद्र चव्हाण, पांडुरंग खोकले, हराळे, वाहनचालक अंकुश राठोड, कदम ,गायकवाड, सोहेल, वाठोरे, डाकोरे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, स्वयंसेवक व राम रतन नर्सिंग काँलेज येथील विद्यार्थीनी यांनीही सहभाग नोंदविला व पल्स पोलोओ मोहीम यशस्वी केली.

Post a Comment

Previous Post Next Post