अखिल भारतीय क्षत्रिय महासभा च्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष सुषमा ठाकूर यांना जिजाऊ सावित्री रत्न पुरस्कार जाहीर20 फेब्रुवारी रोजी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती भीमाशंकर मामा कापसे व  प्रा. गणेश शिंदे यांनी दिली आहे.

 जिजाऊ सावित्री जयंती महोत्सवानिमित्त दैनिक युवाराज्य व आझाद ग्रुप च्या वतीने हा पुरस्कार 
नांदेड शहरातील एमजीएम जवळ नमस्कार चौक येथे असलेल्या हॉटेल गणराज पॅलेस येथे सायंकाळी साडेपाच वाजता देण्यात येणार आहे.सुषमा ठाकूर यांनी कोरोना लॉकडाऊन च्या काळात आपल्या शेतातील पिकलेला 25 क्विंटल गहू गरजूंना वाटप केला होता. घरकाम करणाऱ्या श्रमिक महिलांना संक्रांतीचे वाण म्हणून ब्लँकेट वाटप तसेच सफाई कामगारांना महाराणा प्रताप जयंती निमित्त छत्री वाटप यासारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम घेतले आहे. भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदावर त्या कार्यरत असून अनेक महिलांच्या प्रश्नावर त्यांनी वाचा फोडली आहे. त्यांच्या कार्याविषयी आधारित लेख गौरव जिजाऊ सावित्रीच्या लेकीचा या उत्सवामध्ये  प्रकाशित करण्यात आला आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे . पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर जयश्रीताई पावडे तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून नांदेड जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षाताई ठाकूर, नांदेड जिल्हा परिषद चे अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, नांदेड जिल्हा परिषदेच्या उपकार्यकारी मुख्याधिकारी रेखाताई कदम, नांदेडचे ज्येष्ठ साहित्यिक तथा बाल रोग तज्ञ डॉक्टर हंसराज वैद्य, ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी, यासह प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते सुषमा ठाकूर यांना जिजाऊ सावित्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याबद्दल धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर, पवनसिंह बैस, गणेशसिंह  चव्हाण यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post