नांदेड काँग्रेस - ७० वर्षाचा गौरवशाली प्रवास, पुस्तकाचे लवकरच प्रकाशन
नवीन नांदेड (प्रतिनिधी) - स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकी पासून ते २०२१ च्या देगलूर विधानसभा पोटनिवडणूकी दरम्यान नांदेड काँग्रेसचा विजयी आलेख सविस्तर पणे मांडणाऱ्या, 'नांदेड काँग्रेस - ७० वर्षाचा गौरवशाली प्रवास (१९५१ ते २०२१) या पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होणार असल्याची माहिती लेखक तथा नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सचिव बापूसाहेब पाटील यांनी दिली आहे. 

स्वतंत्र भारताची पहिली लोकसभा व विधानसभा निवडणूका १९५१ मध्ये झाली. सन १९५१ च्या विधानसभा निवडणूकीवेळी नांदेड जिल्हा हैदराबाद स्टेट मध्ये, १९५७ मध्ये द्विभाषीक मुंबई व १९६२ पासून महाराष्ट्र राज्यात राहिलेला आहे. स्वतंत्र भारताच्या सन १९५१ पासून ते २०२१ च्या देगलूर विधानसभा पोटनिवडणूक   पर्यतच्या काळातील सर्व लोकसभा व विधानसभा निवडणूकीतील नांदेड काँग्रेसची कारकीर्द, सविस्तर पणे मांडण्याचा प्रयत्न नांदेड काँग्रेस - ७० वर्षाचा गौरवशाली प्रवास या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या रुपाने राज्य व देश पातळीवरील राजकीय क्षेत्रात नांदेड काँग्रेसचे मोठे योगदान राहिले. त्यानंतर ती परंपरा ना. अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून सुरु आहे. सन १९५१ ते २०२१ दरम्यानची नांदेड काँग्रेस संबंधीत असलेली तत्कालीन छायाचित्रे, निवडक बाबीचा उल्लेख, राष्ट्रीय नेत्यांच्या सभा, निवडणूक निकालांची आकडेवारी इत्यादी सह अन्य विविध बाबींचा पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांचे आसून, पुस्तक मांडणी सजावट देवेंद्रसिंह चंदेल यांनी केली आहे. अशी माहिती पुस्तकाचे लेखक तथा नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव बापूसाहेब पाटील यांनी दिली आहे.
Attachments area

Post a Comment

Previous Post Next Post