खा.बैरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा किनवट मध्ये निषेध 
किनवट:(अकरम चव्हाण)
उत्तर प्रदेशात एम आई एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.असदुद्दीन ओवेसी यांच्यावर काल झालेल्या भ्याड हल्याचा किनवट मध्ये निषेध व्यक्त करून उपजिलाधिकारी यांच्या मार्फत भारताचे राष्ट्रपति यांना निवेदन पाठविण्यात आले.
उत्तर प्रदेशात निवडणुकी दरम्यान प्रचार करण्यासाठी जात असलेल्या ए.आय. एम. आय.एम.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.असदुद्दीन ओवेसी त्यांच्यावर एका टोलनाक्यावर काही समाजकंटकांनी गोळ्या झाडल्या, त्या हल्यात असदुद्दीन ओवेसी हे थोडक्यात बचावले, या हल्ल्याचा निषेध किनवट येथील एम. आय. एम. पक्षाच्यावतीने करण्यात आला.  राष्ट्रपति यांना पाठविलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर ह्यापूर्वी सुद्धा भ्याड हल्ला झाला होता, त्यामुळे त्यांना
 झेड प्लस( Z- PLUS) सुरक्षा देण्यात यावी, तसेच हल्ल्यामागील गुन्हेगारांना तात्काळ शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी पाठविलेल्या निवेदनामध्ये करण्यात आली असून निवेदनावर एम आई एम चे तालुकाध्यक्ष गब्बर काज़ी,फहीम क़ुरैशी, अतीक शेख, अकरम खान, आदिल शेख, अदनान नेहदी, सोहेल पठान, आरिफ शेख, शोएब रहमान,आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post