निवडणूक कामांसाठी ई-निविदा भरण्याचे आवाहन

 


नांदेड दि. 23 :- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक कामांसाठी आवश्यक वस्तू खरेदी / भाडेतत्वावर घेण्याबाबत ई-निविदा मंगळवार 8 मार्च 2022 पर्यंत मागविण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक-2022 च्या अनुषंगाने निवडणुक कामांसाठी आवश्यक मतदार यादी, मतदान केंद्रावरील साहित्य, फर्निचर, वाहन, केटर्स, झेरॉक्स, कॅम्प्युटर, डीटीपी, सीसीटिव्ही, कॅम्प्युटर, हमाली आदी 11 बाबींसाठी https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर ई-निविदा 22 फेब्रुवारी ते 8 मार्च 2022 या कालावधीत मागविण्यात आल्या आहेत. संबंधितांनी या ई-निविदेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (सामान्य) नांदेड यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post