बीडमध्ये जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्या आवारात गोळीबार, दोघे जखमी

 बीड : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या मुद्रांक व नोंदणी कार्यालयात आज (शुक्रवार) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. यात दोघे जखमी झाले असून, या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सतीश बबन क्षीरसागर (वय ३०, रा. लक्ष्मणनगर ,बीड) व फारूक सिद्दीकी (वय २८ रा. जालना रोड, बीड) अशी जखमींची नावे आहेत. ते आज सकाळी मुद्रांक व नोंदणी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. यात दोघांच्याही पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post