KISS आणि HOT सीन्स देण्यासाठी रणबीरला विचारले होते का ? दीपिका पदुकोण म्हणते...
गहराईया हा चित्रपट ११ फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. गहराईया रिलीज होण्याच्या २ दिवस आधीचं चित्रपटाचं आणखी एक गाणं ‘बेकाबू’ रिलीज करण्यात आलं आहे. याआधीचे गाणे डुबे हेदेखील प्रेक्षकांना आवडलं होतं. दरम्यान, या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे दीपिका चांगलीच चर्चेत आली होती. या चित्रपटामध्ये दीपिका पादुकोनसोबत सिद्धांत चतुर्वेदीचे इंटिमेट सीन्स आहेत. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर दोघांच्या किसिंग सीनवरून चांगलीच चर्चा रंगली होती. ट्रेलरमध्ये दीपिका आणि सिद्धांतची केमिस्ट्रीदेखील अफलातून दिसतेय; पण, इंटिमेट सीनविषयी दीपिकाने मोठा खुलासा केला आहे

दीपिकाने गहराईया या चित्रपटातील आपल्या इंटिमेट सीनवर एका मुलाखतीत खुलेपणाने चर्चा केली. यावेळी तिने तिचा पती रणवीर सिंहचाही उल्लेख केला. ती म्हणाली, मला माझा नवरा रणवीर सिंहनेच ऑनस्क्रिन किस सीनला परवानगी दिलीय.दीपिकाच्या गहराईया या चित्रपटाची प्रतीक्षा तिचे फॅन्स करत आहेत. ११ फेब्रुवारीला रिलीज होणाऱ्या या चित्रपटात दीपिका-सिद्धांतशिवाय अनन्या पांडेदेखील दिसणार आहे. ॲमेझा्ॉन प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. ती सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्‍यस्‍त आहे.

मुलाखतीत इंटिमेट सीनविषयी खुलासे

दीपिकाने एका मुलाखतीत या चित्रपटात दिलेल्या इंटिमेट सीनविषयी खुलासे केले. दीपिकाचे सिद्धांतसोबत इंटिमेट सीन आहेत. हे पाहून तिचा पती रणवीर सिंहची काय प्रतिक्रिया आली असेल. शकुन बत्रा दिग्दर्शित या चित्रपटात मॉडर्न रिलेशनशापचं वास्तव दाखवण्यात आलं आहे. ट्रेलरमध्ये दीपिका आणि सिद्धांततचे खूप सारे किसींग सीन आहेत. यावर दीपिका म्हणाली की, रणवीरनेच इंटिमेट सीनसाठी परवानगी दिली होती.

ती म्हणाली, “आम्ही त्यावर प्रतिक्रिया देत आहोत हे मूर्खपणाचे आहे. मला वाटते, आमच्यासाठी, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मी कमेंट्स वाचत नाही. मला खात्री आहे की तोही करत नसेल. मला वाटते, हे खूपचं मूर्खपणा आहे. माझ्‍या पतीला माझ्‍या बद्‍दल अभिमान आहे. येणाऱ्या चित्रपटातील माझ्या परफॉर्मन्सचा खूप अभिमान वाटतो”.

दिग्दर्शक शकून बत्राचा गहराईया

गहराईया या चित्रपटाचे दिग्दर्शक शकून बत्रा यांनी याआधी कपूर अँड सन्स हा चित्रपट आणला होता. गहराईयामध्ये नसीरूद्दीन शाह, धैर्य कारवा, रजत कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post