SSC CHSL Recruitment 2022 : 12 वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, 5000 जागा
 मुंबई - स्टाफ सिलेक्शन कमिशनने सीएचएसएल परीक्षांची घोषणा केली आहे. 5 हजार पदांसाठी भरती होणार आहे. एसएससीने ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख ही 7 मार्च आहे.

लोअर डिव्हीडन क्लर्क (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्ट असिस्टेटं/सॉर्टिंग असिस्टेंट, डाटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) पदांसाठी भरती होत आहे.

इच्छूक उमेदवार या विविध पदासांठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. यासाठी एसएसचीच्या ssc.nic.in अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरता येईल. तसेच उमंग एपद्वारे (Umang App)अर्ज करता येणार आहे.

या पदांसाठी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून 12 वी पास असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराचे वय हे 27 वर्षांपेक्षा जास्त असू नये.

SSC CHSL Recruitment 2022 परीक्षेसंदर्भात महत्त्वाच्या तारखा -

अर्ज करण्याची तारीख - 1 फेब्रुवारी ते 7 मार्च 2022
ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची अखेरची तारीख - 8 मार्च
ऑफलाईन बॅंकेतून परीक्षा शुल्क भरण्याची अखेरची तारीख - 10 मार्च
आवेदन अर्जात दुरुस्त करण्याची तारीख - 11 ते 15 मार्च
टियर -1 कॉम्प्यूटर आधारित परीक्षेची तारीख - मे 2022
टियर- 2 डिस्क्रिप्टिव परीक्षेची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही.

Post a Comment

Previous Post Next Post