दरोडयाचे तयारीत असलेल्या 07 आरोपीतांना 01 पिस्टल व इतर घातक हत्यारासह स्थानिक गुन्हेशाखेकडुन अटक व गुन्हा दाखल

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री व्दारकादास चिखलीकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री पांडुरंग भारती व पोलीस उप निरीक्षक श्री सचिन सोनवणे असे त्यांचे सोबत पोलीस अमंलदार यांना घेवुन माली गुन्हयातील व खुनाचे गुन्हयातील फरार असलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना झाले होते. पेट्रोलींग दरम्यान बारड पोलीस ठाणे हद्यीमध्ये काही इसम धारदार घातक शस्त्र जवळ बाळगुन कोणतातरी गंभीर गुन्हा करण्याचे तयारीने दबा धरुन बसलेले आहेत अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने स्थागुशा, नांदेड चे अधिकारी व अमंलदार हे तात्काळ पोलीस ठाणे बारड हद्यीत रवाना झाले.

शाचे अधिकारी व अमंलदार यांनी बारड ते मुदखेड जाणारे रोडलगत गॅस गोडाऊन जवळ विठ्ठल घोडसे यांचे शेतातील आखाडयाजवळ जावुन झोपडीचे पाठीमागे असलेले संशयीत इसमांना स्थागुशाचे अधिकारी व अमंलदार यांनी सापळा रचुन पकडले असता तेथे इसम नामे 1) प्रदिप ऊर्फ बंटी पिता श्रीराम श्रावणे वय 24 वर्षे व्यवसाय बेकार रा. लक्ष्मीनगर, पुसद जिल्हा यवतमाळ 2) विधीसंघर्षीत बालक 3) संतोष ऊर्फ चिंग्या पिता साईनाथ तरटे वय 22 वर्षे व्यवसाय बेकार रा. खोब्रागडेनगर अण्णाभाऊसाठे चौक, नांदेड 4) रवि नामदेव गायकवाड वय 20 वर्षे व्यवसाय बेकार रा. व्यंकटेशनगर मुदखेड 5) चंद्रकांत ऊर्फ मुनिम पिता गंगाधर सुरेशी वय 23 वर्षे व्यवसाय बेकार रा. कृष्णानगर, मुदखेड 6) अभिषेक ऊर्फ त्र्यबंकराव नागरे वय 19 वर्षे व्यवसाय बेकार रा. गिरगांव मालेगाव ता अर्थापुर ह. मु. चैतन्यनगर, नांदेड 7) पदमानंद ऊर्फ विठल रामेश्वर घोडसे वय 40 वर्षे व्यवसाय मजुरी रा वाणीगल्ली, बारड ता. मुदखेड असे मिळुन आले. पोलीसांनी त्यांना तिथे थांबण्याचे कारण विचारले असता, त्यांनी सुरुवातीला उडवा-उडवीचे उत्तरे दिली. परंतु त्यांना विश्वासात घेवुन, विचारपुस केली असता, त्यांनी बारड मुदखेड रोडवर जाऊन रोडवरुन जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना आडवुन वाहनातील लोकांजवळील पैसे, मोबाईल काढुन घेवुन लुटमार करण्याचे इरादयाने थांबलो आहोत असे सांगीतले. नमुद सात इसमांकडे 01 गावठी बनावटीचे पिस्टल, 01 जिवंत काडतुस 03 खंजर 01 गुप्ती, 01 लोखंडी कत्ता एक दोर (कासरा) 08 मोबाईल 02 मोटार सायकल असा एकुण 86,500/- रुपयाचे घातक धारदार व अग्नीशस्त्र मिळुन आले असुन नमुद आरोपी हे घातक धारदार व अग्नीशस्त्रासह बाळगुन दरोडयाचे तयारीत असल्याचे मिळुन आल्याने त्यांचेविरुद्ध पो उप नि सचिन सोनवणे यांचे फिर्यादवरुन पो. स्टे. बारड गुरनं. 20/2022 कलम 399,402 भाद वि सहकलम 3/25 4/25 भा. ह. का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर नमुद आरोपीतांपैकी 04 आरोपीतांवर गंभीर गुन्हे दाखल असुन आरोपी क्रं. 3 याचा पोलीस ठाणे शिवाजीनगर हधीतील मगनपुरा येथील खुनातील गुरनं. 67/2022 कलम 302, 341 भा द वि सह 3/25 भा. ह.का. मध्ये सहभाग असुन, आरोपी क्रं. 1 याचा पोलीस ठाणे सोनखेड गुरनं. 28/2022 कलम 394,34 भा द वि व लिंबगाव गुरनं. 21/2022 कलम 394,34 भा द वि गुन्हयात सहभाग आहे. नमुद आरोपीताकडुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन त्यांना पुढील तपासकामी पोलीस ठाणे बारड यांचेकडे देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. श्री प्रमोद शेवाळे, पोलीस अधीक्षक, नांदेड, यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री व्दारकादास चिखलीकर पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेड, सपोनि पांडुरंग भारती, पोउपनि/ सचिन सोनवणे, पोहेकॉ/ भानुदास वडजे, मारोती तेलंग, संजय केंद्रे, पो ना/ विठ्ठल शेळके, पोकॉ/ रवि बाबर, तानाजी येळगे, मोतीराम पवार, विलास कदम, गणेश धुमाळ, चालक / अर्जुन शिंदे, कलीम शेख यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post