जनशक्ती संघटनेच्या मराठवाडा संपर्क प्रमुखपदी प्रभाकर लखपत्रेवार यांची निवड(कालिदास अनंतोजी)
नांदेड) सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या जनशक्ती संघटनेच्या मराठवाडा संपर्क प्रमुखपदी नायगाव येथील जेष्ठ पत्रकार प्रभाकर लखपत्रेवार यांची निवड करण्यात आली असून. निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष उमाकांत पाटील तिडके यांचे हस्ते देण्यात आले आहे. सदरच्या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे. 

      महाराष्ट्रात प्रभावशाली संघटना म्हणून नावारूपास येत असलेल्या आणि संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे यांच्या समर्थ नेतृत्वाखाली सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या जनशक्ती संघटनेची चळवळ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा संघटनेचा घटक होण्यासाठी नायगाव येथील जेष्ठ पत्रकार प्रभाकर लखपत्रेवार यांची निवड करण्यात आली आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात मागच्या २० वर्षांपासून कार्यरत असलेल्या लखपत्रेवार यांची जनशक्ती संघटनेच्या मराठवाडा संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली असल्याने ग्रामीण भागात संघटना मजबूत करण्यासाठी बळ मिळणार आहे. 

      पत्रकारितेबरोबरच सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेवून काम करणाऱ्या लखपत्रेवार यांच्या कामाची दखल घेवून संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमाकांत पाटील तिडके यांनी मराठवाडा संपर्क प्रमुखपदी निवड करुन नियुक्ती पत्र दिले आहे. संघटनेचे ध्येय धोरणे व शेतकरी, कामगार, निराधार यांचा आधार होण्याबरोबरच  संघटनेची प्रतिमा उंचावण्यासाठी काम करावे अशी अपेक्षा तिडके यांनी व्यक्त केली. यावेळी हिंगोली परभणीचे संपर्क प्रमुख वैभव देशमुख, जिल्हाध्यक्ष शंकरसिंह ठाकूर, जिल्हा कार्याध्यक्ष मारोती शिकारे, रंगराव देशमुख व अमोल गायकवाड यांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post