माळटेकडीवर झालेल्या गोळीबार प्रकरणातील तक्रारच संशयास्पद

 


नांदेड,(प्रतिनिधी)-माळटेकडी पुलावर दुपारी झालेल्या गोळीबार प्रकरणातील फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत अनेक मुद्दे संशयास्पद आहेत. विमानतळ पोलिसांनी या प्रकरणी जिवघेणा हल्ला या सदरात गुन्हा दाखल केला आहे.

जखमी अवस्थेतील वाल्मिक नगरमधील युवक दिपक बिघानीया (३०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार काल दि.१८ मार्च रोजी आपल्या कुटुंबियांसोबत रंग खेळल्यानंतर टरबूज आणण्यासाठी मालटेकडी पुलावरुन फ्रुट मार्केटकडे जात असताना पुलाच्या खाली आल्यावर त्यांच्या लक्षात आले की, माझ्याकडे पैसे नाहीत. म्हणून ते पुन्हा दुसऱ्या बाजूने पुलावरुन वाल्मिकनगरकडे जात असताना समोरुन आलेल्या दोन जणांनी आपल्या गाडीवरुन उतरुन त्यांच्यावर गोळीबार केला. एक गोळी डाव्या पायाच्या मांडीत लागली आणि एक गोळी डाव्या हातास लागली. त्यानंतर मी घरी गेलो घरी माझ्या कुटुंबियांनी मला उपचारासाठी दवाखान्यात आणले. या तक्रारीवरुन विमानतळ पोलिसांनी गुन्हा क्र.९७/२०२२ भारतीय दंडसंहितेच्या कलम ३०७ सह भारतीय हत्यार कायद्यातील कलमानुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक बाळू गिते यांच्याकडे देण्यात आला आहे.

गोळीबाराचा प्रकार घडताच अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार घटनास्थळी गेले होते. दिपक बिघानीया जेथे गोळीबार झाला असे सांगतो त्याठिकाणी रक्तच सापडले नाही. तसेच तो तेथून घरी गेला आणि घरी जावून बेशुध्द झाला या बोलण्यावर सुध्दा पोलिसांचा विश्वास नाही. पण दिपक बिघानीयाला दोन ठिकाणी गोळ्या लागल्या आहेत आणि त्याचे मारेकरी ते तोंडाला रंग लावलेले होते म्हणून आज तक्रारीनुसार अज्ञात आहेत. विमानतळ पोलिसांनी आज सकाळपासून अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत पण त्यातून काय माहिती बाहेर आली याबद्दल काही संदर्भ प्राप्त झालाच नाही. दिपक बिघाणीयावर जिवघेणा हल्ला करणाऱ्याचा विमानतळ पोलीस शोध घेत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post