हिमायतनगर नगरपंचायतचा अजब कारभार; ११ महिने शौचालय कुलुपबंद..!

शेवटच्या महिन्यात चालू ठेऊन वरिष्ठांची शाब्बासकी मिळविण्याचा प्रयत्न  

हिमायतनगर, अनिल मादसवार| स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मागील पंचवार्षिक काळात हिमायतनगर नगरपंचायतीने लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाला जवळपास ५ वर्ष लोटले आहेत. त्यापैकी अनेक शौचालयाचे सांगाडे जमीनदोस्त झाली आहेत. त्या काळात हि शौचालय वर्षातील ११ महिने कुलूपबंद तर शेवटचा मार्च महिना आला कि..? नागरपंचायतमार्फत बैनरबाजी करून शौचालय चालू असल्याचे दाखवून शासनाचा निधी लाटण्याचे काम प्रशासनातील संबंधित विभागाचे अधिकारी करत आहेत. अशा परिस्थितीत शहरातील गोर-गरीब परिसरातील नागरिकांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. स्वच्छता मोहिमेची जबाबदारी असणारे अधिकारी किती बेफिकीर आहेत, याचा प्रत्यय या प्रकारावरून दिसून येत आहे.

हिमायतनगर नगरपंचायत विभागात स्वच्छता, पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा विभागाचे अभियंता व संबंधित अधिकारी-पदाधिकारी यांच्या देखरेदीखाली स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुलभ शौचालय उभारण्यात आली. यासाठी लाखो रुपयाचा खर्च करण्यात आला. मात्र एक दोन महिन्यानंतर वरिष्ठ पातळीच्या टीमने भेट देऊन पाहणी केल्यानंतर सामुदायिक स्वच्छतागृह केवळ दिखावा बनले असे शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे. शहरातील सर्वच प्रभागातील नागरिकांना शौचालय का बंद ठेवण्यात आली होती, हे कळत नाही.

येथील नगरपंचायतीने स्वच्छता मोहिमेवर भर देत शहर उघड्यावरील शौचमुक्त करण्यासाठी सार्वजनिक सामुदायिक शौचालये बांधण्यात आली. मात्र त्याचा वापर खऱ्या अर्थाने झालाच नाही. कारण मागील पंचवार्षिक काळात वर्षातील ११ महिने शौचालय बंद आणि शेवटच्या महिन्यात म्हणजे मार्च महिन्यात हि शौचालय चालू असल्याचे दाखवून केवळ शासनाचा निधी लाटण्याचे काम संबंधितांकडून केले जात आहे. या वास्तवाची पोल पुन्हा प्रशासकाच्या काळात खुलली असून, हिमायतनगर शहरात आठ दिवसापूर्वी सुरु केलेल्या बोटावर मोजण्याइतक्या शौचालयाच्या प्रकारावरून दिसते आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या बोरगडी रोड, पळसपूर रोड, यासह चारही बाजूनी मुख्य रस्त्यावर बांधलेली सुलभ शौचालय लहान मुलांसह वाहनधारक व ये-जा करणाऱ्या महिला- पुरुष नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. गेल्या पंचवार्षिक काळातील वर्षातील ३६५ दिवस हे शौचालय बंद ठेऊन नपाच्या अधिकारी - पदाधिकाऱ्यांनी काय सध्या केले हे कळायला मार्ग नाही. आजही लोकल शहराच्या शेवटच्या टोकाला लोकांच्या सोयीसाठी बांधलेले सामुदायिक शौचालय बंदच आहेत. त्यामुळे शौचालय उभारणीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या या खेळात शौचालय बांधकाम आणि वापराचे सर्व मापदंड बाजूला पडले आहेत. त्यामुळे जनतेच्या सोयीची योजना जनतेवरच जड झाली.

आता मार्च एंडच्या शेवटच्या आठवड्यात हिमायतनगर शहरातील मुख्य चौकात सार्वजनिक शौचालय गुग्गलवर दिसतात..  आता आम्ही  शौचालयांचा वापर करतो, अशी बैनर लावून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार हिमायतनगर नगरपंचायतीने शहरात सुरु केल्याचे पाहावयास मिळते आहे. नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी हे शौचालय, पाणी पुरवठा, वीजपुरवठ्याच्या या गैर प्रकाराकडे कशा पद्धतीने पाहतात. आणि नगरपंचायत कार्यालयात झालेल्या आलबेल प्रकाराबाबत काय कार्यवाही करतात याकडे शहरवासीय जनतेचे लक्ष लागले आहे.  Post a Comment

Previous Post Next Post