संविधानातील मूलभूत हक्कांविषयी जागरूकता काळाची गरज-डॉ.प्रमोद वाघमारे

मुजामपेठ दि.२२, संविधानातील मूलभूत हक्काविषयी प्रत्येक नागरिकांमध्ये जागृतता असली पाहिजे असे मत डॉ. प्रमोद वाघमारे यांनी व्यक्त केले ते कै. वसंतराव काळे वरिष्ठ  महाविद्यालय, देगलूर नाका नांदेड राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष युवक शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. संविधान निर्मितीची पार्श्वभूमी व संवैधानिक सद्यस्थितीची चिकित्सक मांडणी करतांना डॉ.वाघमारे यांनी मूलभूत हक्कांचे महत्व अधोरेखित करतांना आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संविधानातील मूलभूत हक्कांविषयी जागरूकता काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमातील दुसरे मार्गदर्शक डॉ. जे यु हटकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारी विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी एमपीएससी आणि यूपीएससी यांची तयारी कशी केली पाहिजे.  तयारी करत असताना कोणत्या घटकाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे कोणती पुस्तके संदर्भ म्हणून वापरली पाहिजेत याविषयी सखोल असे मार्गदर्शन डॉ. हटकर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.उस्मान गनी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.बाबासाहेब भुक्तरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शेख नजीर यांनी केले तर आभार प्राध्यापक नुरी मॅडम यांनी मानले यावेळी प्रा. निजाम इनामदार, प्रा. मोहम्मद दानिश, प्रा. डॉ. सय्यद वाजिद प्रा.तहरिन मॅडम,अक्षय हासेवाड आणि राष्ट्रीय सेवा योजना विशेष युवक शिबिरातील शिबिरार्थी उपस्थित होते.  कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post