राष्ट्रीय सिनियर धनुर्विद्या महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी वृषाली पाटील जोगदंड यांची निवड


जम्मु कश्मीर येथे भारतीय धनुर्विद्या संघाच्या वतिने आयोजीत ४१ व्या एन.टी. पी. सी. राष्ट्रीय सिनियर धनुर्विद्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी नांदेडच्या सचिव वृषाली पाटील जोगदंड यांची निवड भारतीय धनुर्विद्या संघटनेचे महासचिव तथा राज्य संघटना सचिव शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रमोद चांदूरकर यांनी केली आहे. जम्मु कश्मीर येथील एम. ए स्टेडियम येथे दिनांक २२ ते २७ मार्च २०२२ दरम्यान आयोजीत ४१ व्या एन. टी. पी. सी. राष्ट्रीय मुले व मुली सिनीयर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. असून त्यात रिकर्व्ह प्रकारच्या प्रशिक्षकपदी नांदेडच्या सौ. वृषाली बालाजी पाटील जोगदंड यांची निवड करण्यात आली आहे. या अगोदरही त्यांनी शालेय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या प्रशिक्षीका म्हणून राज्याला पदक मिळवून दिले आहे. तर ऑल इंडीया इंन्टर युनिवरसिटी स्पर्धेतही स्वा.रा.ति मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशिक्षीका म्हणून उत्कृष्ठ कार्य केले आहे. तर झारखंड येथे आयोजित नॅशनल गेम मधेही त्याचे कार्य कौतुकास्पद राहीले आहे. त्याच्या या निवडीबद्दल त्याचे भारतीय धुनर्विद्या संघाचे महासचिव शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रमोद चांदूरकर भारतीय ऑलम्पीक संघाचे माजी प्रशिक्षक रविशंकर संर, ब्रिजेश कुमार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रविण बोरसे, स्टेडीयम व्यवस्थापक रमेश चवरे, जिल्हा ऑलम्पीक संघटना नांदेडचे अध्यक्ष रामलू पारे उपाध्यक्ष अवतारसिंघ रामगडीया, राज्य धुनर्विद्या संघटना सहसचिव सोनल बुंदेले, प्रलोभ कुलकर्णी, प्रा. जयपाल रेड्डी जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, किशोर पाठक, गुरदिपसिंघ जनार्दन गुपीले कार्याध्यक्ष डॉ. हंजराज वैघ, पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. विठ्ठलसिंह परीहार डॉ. मनोज पैजने डॉ. अश्वीन बोरीकर, डॉ. विजय वडजे. बाबू गंदपवाड, सुरेश पांढरे, सुधाकर जोगदंड, राजेंद्र सुगावकर, मालोजी कांबळे, शिवाजी पुजरवाड, प्रकाश जाधव नारायण गिरगावकर, अनंत बोबडे, गंगालाल यादव, प्रशिक्षक अनिल बंदेल, डॉ. राहूल वाघमारे, राजश्रीताई पाटील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजय कांबळे, सुशिल दिक्षीत, राजेश जांभळे प्रविण कुपटीकर, शंकर जाधव, बालाजी चेरले, डॉ. रमेश नांदेडकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे

Post a Comment

Previous Post Next Post