आ. अमरनाथ राजुरकर यांच्या निवडीबद्दल सिडकोत जल्लोषफटाक्यांची अतिषबाजी; कार्यकर्त्यांनी वाटले पेढे

नवीन नांदेड,दि.24- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटीचे उपाध्यक्ष व विधान परिषदेतील काँग्रेसचे प्रतोद आ. अमरनाथ राजुरकर यांची काँग्रेस पक्षाने विधान परिषदेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी दोन दिवसापूर्वी निवड करण्यात आली. या निमित्त सिडको ब्लॉक काँग्रेस कमीटीच्या वतिने या निवडीनिमित्त फटाक्यांची अतिषबाजी आणि कार्यकर्त्यामध्ये पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.
सिडको ब्लॉक काँग्रेसचे प्रभारी संतोष पांडागळे, काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडको ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष विनोद कांचनगिरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून आनंदोत्सवास सुरुवात करण्यात आली त्यानंतर याच ठिकाणी फटाक्याची अतिषबाजी करुन पेढे वाटण्यात आले.
यावेळी जि.प.चे माजी सदस्य आनंद गुंडले, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा व माजी नगरसेविका प्रा. डॉ. ललिता शिंदे-बोकारे, माजी नगरसेवक प्रा. अशोक मोरे, कार्याध्यक्ष राजू लांडगे, डॉ. नरेश रायेवार, डॉ.बाबुराव ढगे, शेख लतिफ, आहात खान पठाण, शेख नूरुद्दीन, देवीदास कदम, विश्‍वनाथ शिंदे, भि. ना. गायकवाड, निवृती कांबळे, नारायण कोलंबीकर,किशनराव
रावणगावकर, देवीदास कदम, प्रा डॉ. रमेश नांदेडकर, संजय कदम, संतोष बारसे, प्रा.गजानन मोरे, काशिनाथ गरड, रामराव जावरे, पंढरीनाथ मोटरगे, के.एल. ढाकणीकर, नामदेव पदमने, माणिक श्रोते, संतोष कांचनगिरे, वैजनाथ माने, गणेश खंदारे, भगवान जोगदंड, ॲड.संदिप गायकवाड, अक्षय मूपडे, प्रकाश वानखेडे, दत्तराम कोकणे,  प्रभू उरुडवड, संदिप कदम, संगम कांचनगिरे, सायलू अडबलवार, प्रा.शशीकांत हाटकर, श्रीमती विजया काचावार, श्रीमती सुभद्रा कदम, श्रीमती पार्वती कोरडे, सौ. विमल चित्ते सौ. अनिता गज्जेवार, सौ. ज्योती कदम, सौ. संतोषी भाले, सौ.बारसे, शेख मॅडम, सौ.गायकवाड, यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती

Post a Comment

Previous Post Next Post