नांदेड-जम्मू तावी हमसफर एक्स्प्रेस च्या कोच रचनेत कायमचा बदल करून दोन डब्यांची वाढ

  गाडी संख्या 12751/ 12752 हुजूर साहिब नांदेड-जम्मू तावी- हुजूर साहिब नांदेड साप्ताहिक हमसफर एक्स्प्रेस च्या कोच रचनेत म्हजेच डब्यांच्या संखेत कायम स्वरूपी बदल करण्यात आला आहे. तसेच या गाडीच्या डब्यांची सख्या वाढविण्यात आली आहे.

 

या गाडीत आत्ता पर्यंत 16 डब्बे लावले जात होते ज्यात 13 तृतीय श्रेणी वातानुकुलीत, 2 लगेज कम जनरेटर ब्रेक व्हेन  आणि एक खानपान डब्बा असे 16 डब्बे लावले जायचे.

 

दिनांक 1 एप्रिल रोजी नांदेड येथून सुटणाऱ्या गाडीमध्ये आणि दिनांक 03 एप्रिल रोजी जम्मू तावी येथून सुटणाऱ्या गाडीमध्ये 16 च्या ऐवजी 2 डब्बे वाढवून 18 डब्बे लावले जातील. यात 2 लगेज कम जनरेटर ब्रेक व्हेन, एक खानपान डब्बा, 09  तृतीय श्रेणी वातानुकुलीत डब्बे आणि 06 द्वितीय श्रेणी शय्या (स्लीपर क्लास) चे डब्बे लावले जाणार आहेत.

 

दिनांक 1 एप्रिल पासून या गाडीमध्ये तृतीय श्रेणी वातानुकुलीत चे 04 डब्बे कमी करण्यात येणार आहेत आणि 06 डब्बे द्वितीय श्रेणी शय्या (स्लीपर क्लास) चे वाढविण्यात येणार आहेत, प्रवाश्यांनी कृपया याची नोंद घ्यावी.

Post a Comment

Previous Post Next Post