नांदेड शहारातील लालवाडी चौकात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते


रमझान महिन्यात अनेक ठिकाणी इफ्तार पार्ट्या असतात . पण लालवाडी इथली ही इफ्तार पार्टी थोडी वेगळी होती . कारण या इफ्तार पार्टीतुन सामाजिक एकात्मतेचा संदेश होता . या इफ्तार पार्टीत परिसरातील सर्व धर्मीयाचे नागरीक उपस्थित होते . सध्या सर्वकडे धार्मिक तेढ निर्माण होत असतांना या लालवाडी भागातील  सर्वधर्मीयांनी हा आदर्श समाजा समोर ठेवला . रमझान हा सण इस्लाम धर्मीयांचा जरी असला तरी इथं सर्व समाजाचे लोक एकोप्याने सण साजरे करतात . पोलीस विभागात कार्यरत असलेले पांडूरंग माने नेहमी यासाथी पुढाकार घेतात . आताही पांडूरंग माने यांनी सर्वधर्मीयांची इफ्तार पार्टी ही आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला होता . 
त्यानुसार शेख फारुख शेख शाझील लाला मित्र मंडळाने परिश्रम घेऊन इफ्तार पार्टीचे उत्तम नियोजन केले .लालवाडी ,महर्षी दधीची सोसायटी , नारायण नगर ,अरविंद नगर येथील सर्व धार्मियाचे नागरिक या इफ्तार पार्टीत सहभागी झाले होते . 

Post a Comment

Previous Post Next Post