दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतिने अभिवादन.


नांदेड/प्रतिनिधी-
मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर  यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने आज अभिवादन करण्यात आले.
   प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने सायं.दै.नांदेड वार्ता कार्यालय,नांदेड येथे आयोजीत कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.
   या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष ॲड.प्रदीप नागापूरकर तर, मराठी पञकार परिषदेचे लातूर विभागीय सचिव प्रकाश कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष गोवर्धन बियाणी,जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव मा.भवरे,महानगर उपाध्यक्ष अविनाश पाटील, सोशल मिडिया निमंत्रक इंजि.गजानन कानडे,संजय लष्करे,गणेश संदुपटला,नागसेन डोंगरे आदींची यावेळी उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post