पालकमंत्री कमिट्या जाहीर करत नसल्यामुळे कंधार चे सत्ताधारी कार्यकर्ते अस्वस्थ
विरोधी पक्षाच्याच कार्यकर्त्यांची कंधार मध्ये चलती

कंधार(प्रतिनिधी) महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात येवून जवळपास तिन वर्ष होत आहेत तरी कंधार तालुक्यातील विविध शासकीय व अशासकीय कमिट्या तयार असूनही नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांनी कमिट्या जाहीर केल्या नसल्याने कार्यकर्त्यांमधे अस्वस्थता निर्माण झाली असून याचा प्रत्यय काल पालकमंत्री कंधार ला आले असता दिसून आला.
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षाचे सरकार सत्तेवर आहे,प्रोटोकॉल प्रमाणे या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते शासनाच्या विविध कमिट्यांवर असायला पाहिजेत म्हणून तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या त्या त्या कमिट्यांवरिल शिफारसी सह याद्या पक्षाच्या जबाबदार पदाधिकारी यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कडे दाखल करुन तब्बल तीन वर्ष होत आहेत पण पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सदरिल याद्या जाहीर केल्या नसल्याने तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून बोलता येईना व सहन बी होईना या विवंचनेत आले आहेत, कोणताच अधिकार नसतांना जनतेची कामे करायची कशी हा यक्ष प्रश्न तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाला असून प्रत्येक ठिकाणी विरोधी पक्षाचे नेते खा.प्रतापराव पा.चिखलीकर यांच्या कार्यकर्त्यांचीच चलती आहे,सत्ताधारी असूनही सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कोणीच जुमानत नाही, जनतेची कामे करायची कशी,एखाद्या कार्यालयात सत्ताधारी कार्यकर्ते गेलेतरी समोरचा अधिकारी म्हणतो आपण कोण....? आपणास काय अधिकार....?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका समोर येत आहेत, कोणत्या तोंडाने जनतेसमोर मत मागायला जायचे अशा दुविधेत तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते सापडले असून ही अडचण स़ांगण्यासाठी सुद्धा  पालकमंत्री कंधार ला असता सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पालकमंत्री यांना भेटू दिले नाही, याची गांभीर्याने दखल आता दस्तुरखुद्द ना.अशोकराव चव्हाण यांनी घ्यावी व तात्काळ शासकीय, अशासकीय कमिट्या जाहीर कराव्यात अशी सत्ताधारी कार्यकर्त्यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post