राज्यात मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात २४ तासांत पावसाचा इशारापुणे : दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेटे आणि लगतच्या प्रदेशात नैऋत्य मान्सून आगमनाच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती असून, येत्या २४ तासात अग्नेय बंगालच्या उपसागरात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे.

राज्यात विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४६.८ अंश सेल्सिअस आणि सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १७.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

मान्सून आगमनाच्या दृष्टीने सध्या दक्षिण भारतात अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. पुढील २ दिवसात केरळ, माहेमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, त्यानंतरच्या ३ दिवसात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात १६ ते १९ मे दरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाबरोबरच पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात १६ ते १९ मे दरम्यान मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ ते १९ दरम्यान हलक्या पावसाची शक्यता आहे.

विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून, १६ ते १९ मे दरम्यान तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post