किनवट शास्त्रीनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मूळ सभासदांना डावलून खोट्या कागदपत्रआधारे अनेकांना सभासद बनवून फसवणूक

किनवट प्रतिनिधी किनवट येथील शास्त्रीनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या  मूळ सभासदांना डावलून खोट्या कागदपत्रआधारे अनेकांना सभासद बनवून फसवणूक केल्याप्रकरणी सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ मुकेश बारहाते यांनी तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश भोकर येथील सहकार अधिकारी व लेखा परिक्षेकला नुकतेच दिले आहेत

 किनवट येथील शास्त्रीनगर सहकारी संस्थेने 1981 साली किनवट गोकुंदा मार्गावर असलेली साडेचार एकर जागा सभासदांच्या घरासाठी खरेदी केली होती या संस्थेत एकूण तीस लोकांनी अधिकृतपणे सभासद नोंदणी करून जमीन खरेदी केली  व नियमाप्रमाणे प्लॉटसाठी संस्थेचे अध्यक्ष हनुमंतराव दडगेलवार  यांच्याकडे नियमितपणे पैसे जमा केले. 1988 पर्यंत संस्थेच्या अध्यक्षांनी सदर क्षेत्रावर मूळ 30 सभासदांसाठी  लेआउट तयार करून घर बांधकामाच्या परवानगीसाठी किनवट नगर परिषदेकडे  सभासदांच्या यादीसह अहवाल सादर केला परंतु त्यानंतर पूरप्रवण क्षेत्राच्या नावाखाली या जागेवरील प्लॉट वादग्रस्त ठरून वाटपाची प्रक्रिया रखडली 1988 नंतर संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष हनुमंतराव दडगेलवार यांनी मनमानी कारभार करत अनेक मूळ सभासदांना डावलून खोट्या कागदपत्र आधारे नव्या सभासदाचा संस्थेच्या यादीत भरणा केला सन 2017 पर्यंतच्या सभासद यादीत मोठ्या प्रमाणात घोळ करून  मूळ सभासदांना बेदखल करण्यात आले सध्या संस्थेच्या  प्लॉटिंगचे भाव गगनाला भिडले असून तत्कालीन  अध्यक्षांच्या  निधनानंतर त्यांचे सुपुत्र रामकृष्ण दडगेलवार  यांच्याकडे अध्यक्ष पदाची सूत्रे गेली  परंतु त्यांनीही वडिलांच्या गैरकारभार वारसाहक्काने पुढे नेत सदर जागेवर प्लॉटिंग तयार करून विक्री करण्याचा घाट घातला आहे दरम्यान ही बाब लक्षात येताच संस्थेच्या अनेक मूळ सभासदांनी संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अध्यक्षा विरोधात  लेखी तक्रारी सुरू केल्या.मूळ सभासदपैकी रामराव बाजूलागे व उमरी येथील मिराबाई नामदेव कांबळे यांनी  या प्रकरणी जिल्हाधिकार्यासह जिल्हा उपनिबंधकाकडे  यांच्याकडे लेखी तक्रार केल्यानंतर त्याची दखल घेत  जिल्हा उपनिबंधक डॉ मुकेश बारहाते यांनी तक्रारीच्या अनुषंगाने सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश भोकर येथील सहकारी संस्थेचे सहकार अधिकारी श्रेणी-2 एन बी जाधव व लेखापरीक्षक एस बी हंबर्डे यांना नुकतेच दिले असून या प्रकरणाची निःपक्षपातीपणे सखोल चौकशी झाल्यास अध्यक्षांच्या गैरकारभाराचे
 पितळ उघडे पडणार आहे

Post a Comment

Previous Post Next Post