''ताई चष्मा लागू नये, पण. पंकजा मुंडेंच्या टोमण्याला आदित्य ठाकरेंचं उत्तरमुंबई, 18 मे: मुंबईत  एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राजकीय मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी एकाच मंचावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  अमित देशमुख बाळासाहेब थोरात धनंजय मुंडे पंकजा मुंडे प्रीतम मुंडे  उपस्थित होते.

यावेळी या कार्यक्रमाच्या मंचावर सर्व प्रमुख पाहुण्यांची टीका-टिप्पणी पाहायला मिळाली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी पंकजा मुंडेंना टोमणा मारल्याचं पाहायला मिळालं. प्रभादेवी येथील डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते पार पडलं.

या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी लेन्स शब्दावरून चांगलीच टोलेबाजी करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं पाहायला मिळालं. काय म्हणाल्या पंकजा मुंडे पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा उल्लेख केला आणि म्हणाल्या की, ज्या व्यक्तीच्या अनुभवाच्या राजकीय दृष्टीच्या लेन्सेस चांगल्या आहेत...असे माननीय शरद पवार, ज्यांच्या लेन्सेस सर्वांना सूट करतील, जे सोबर, प्रेमळ वागतात, असे बाळासाहेब थोरात.. एक नवीन चेहरा, ज्यांच्याकडून इतरांना दृष्टी मिळण्याची अपेक्षा आहे. ज्यांच्या लेन्सेसकडे युवक पहात आहेत असे आदित्य ठाकरे...

आमचे शेजारी.. विलासराव देशमुख आणि मुंडे यांच्यातील मैत्रीची परंपरा असलेले..अमित देखमुख. मुंडे-महाजनांच्या लेन्सेसमधून स्वतःला मोठं करत पवार साहेबांच्या लेन्सेसमधून बघणारे. पवार साहेबांच्या लेन्समधून बघण्याचं भाग्य खूप कमी लोकांना लाभलंय...असे धनंजय मुंडे.माझ्या लेन्समधून बघत, काम करणाऱ्या पण खूप मेरीट असणाऱ्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे यांना मी अभिवादन करते.

काय म्हणाले आदित्य ठाकरे पंकजा ताई चष्मा लागू नये, पण लागला तर कुठला लागला पाहिजे हे मी सुचवलं, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, पंकजा ताई तुम्ही मला माझ्या लहानपणीपासून ओळखता. आपण सांगितलं की, चष्मा लागला नाहीय आणि मला माहितीय एकदा चष्मा लागल्यानंतर नंबर वाढत गेल्यानंतर काय त्रास असतो ते माहितेय. जर लागला तर कुठचा लावावा हेच एवढंच सांगितलं मी त्यांना बाकी पुढचं काही बोललो नाही.

काय म्हणाले अमित देशमुख येथे आल्यावर कळलं की मुंडे बहिण आणि बंधूंचे बरं चाललं आहे, असा चिमटा. अमित देशमुख यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना काढला आहे. आम्हीच बेजार आहोत, पंकजा मुंडे यांचा विचार आला की धनंजय मुंडे यांना काय वाटेल. तुमच्या या घरोब्यात आम्हाला ही सामावून घ्या. हीच महाराष्ट्राची राजकीय परंपरा असल्याचं अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post