अँड्रयू सायमंड्सचा मृत्यू, मंकीगेटपासून दारूच्या व्यसनापर्यंत. वादाशी होते नाते

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स  यांचे कार अपघातात निधन झाले.

46 वर्षीय सायमंड्सच्या कारला क्विन्सलँडच्या टाऊन्सविलेजवळ अपघात झाला. क्विन्सलँड पोलिसांनी एका निवेदनात म्हटले की, सायमंड्सच्या कारचा अपघात शनिवारी रात्री 10.30 वाजता झाला. सायमंड्स स्वत: कार चालवत होता. 

अचानक त्याची कार रस्ता सोडून पलटी झाली. घटनास्थळी पोहोचलेल्या आपत्कालीन सेवांनी सायमंड्सला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो जखमी झाला होता. हा अपघात कसा झाला याचा तपास फॉरेन्सिक क्रॅश युनिट करत आहे. 

ऑस्ट्रेलियासाठी 26 कसोटी सामने खेळलेल्या सायमंड्सने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपला ठस्सा उमटवला आहे. सायमंड्स हा 1999 - 2007 च्या क्रिकेट विश्वावर राज्य करणार्‍या ऑस्ट्रेलिया संघाचा महत्त्वाचा भाग होता. संघसहकार्‍याच्या आकस्मिक मृत्यूच्या वृत्तावर माजी यष्टिरक्षक अ‍ॅडम गिलख्रिस्ट ने लिहिले आहे की, हे खरोखर खूप दुखद आहे. 

ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी धक्कादायक वर्ष
ऑस्ट्रेलियासह जगभरातील क्रिकेट चाहते सायमंड्स च्या निधनामुळे अस्वस्थ आहेत.
रॉड मार्श आणि शेन वॉर्नसारख्या दिग्गजांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर सायमंड्सचे या वर्षी निधन होणे अत्यंत क्लेशदायक आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलर (Mark Taylor) म्हणाला, क्रिकेटसाठी हा आणखी एक दु:खाचा दिवस आहे.
पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) ने ट्विट केले की, आमचे मैदानावर आणि त्यापलीकडेही सुंदर नाते होते.

मंकीगेटचे स्मरण 
2008 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सने दावा केला होता की भारतीय ऑफस्पिनर हरभजन सिंगने  त्याला माकड म्हटले.
या प्रकरणावर सुनावणी होऊन भारतीय ऑफस्पिनरला क्लीन चिट देण्यात आली.
या प्रकरणाला 'मंकीगेट' म्हटले जाते.

सायमंड्सने मे 2009 मध्ये ऑस्ट्रेलियासाठी शेवटचा सामना खेळला होता.
एक महिन्यानंतर, त्याला दारू पिण्यासंबंधी आणि अन्य मुद्द्यांवर अनेक नियम मोडल्याप्रकरणी वर्ल्ड टी 20 मधून स्वदेशात पाठवण्यात आले होते आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याचा करार रद्द केला होता.

Post a Comment

Previous Post Next Post