नवाब मलिकांची प्रकृती खालावली; महत्त्वाची माहिती समोर



 मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. नवाब मलिक यांना अखेरीस खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कुर्ला येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये नवाब मलिक यांना दाखल करण्यात आले आहे. मलिक यांना किडनी आणि इतर व्याधींचा त्रास होत आहे, आता त्यांच्यावर खासगी रुग्णालयात पुढील उपचार होणार आहे. या संदर्भातील वृत्त टीव्ही 9 मराठीने दिलं आहे.

2 मे रोजी नवाब मलिक यांना आर्थर रोड कारागृहातून जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चालली होती.

दरम्यान, मलिक यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार होणार असून यावेळेस मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. हॉस्पिटल बाहेर ठेवण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताचा खर्च हा मात्र नवाब मलिक यांना करावा लागणार आहे, असे निर्देश कोर्टाने दिले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post