मनमाड-अंकाई दरम्यान दुहेरीकरण – देवगिरी एक्स्प्रेस 26 जून ला हि रद्द, निझामाबाद-पंढरपूर गाडी पूर्ववत धावणारमध्य रेल्वे ने कळविल्या नुसार मनमाड ते अंकाई  किल्ला दरम्यान दुहेरीकरणाचे कार्य पूर्ण करण्याकरीता, अंकाई किल्ला स्थानकावर  यार्ड री-मोडेलिंग कार्य करण्याकरिता आणि इतर संबंधित कार्य पूर्ण करण्याकरिता मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.

याचा परिणाम काही रेल्वे गाड्यांवर झाला आहे, काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या कार्यालयाने दिनांक 24 जून रोजी दिलेल्या प्रेस नोट क्र. 212 नुसार गाडी संख्या 17058 सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस दिनांक 25 आणि 27 जून रोजी रद्द करण्याचे कळविले आहे.

आज मध्य रेल्वे ने कळविल्या नुसार ---

1.)    गाडी संख्या 17058 सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस दिनांक 25, 26 आणि 27 जून रोजी रद्द करण्यात आली आहे. (तीन दिवस)

2.)    तसेच गाडी संख्या 17057 मुंबई – सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस दिनांक 26, 27 आणि 28 जून रोजी रद्द करण्यात आली आहे.  (तीन दिवस)

निझामाबाद-पंढरपूर-निझामाबाद विशेष एक्स्प्रेस गाडी पूर्ववत ----

या कार्यालयाने दिनांक 24 जून रोजी दिलेल्या प्रेस नोट क्र. 212 नुसार गाडी संख्या  01413 निझामाबाद-पंढरपूर विशेष एक्स्प्रेस दिनांक 24.06.2022 ते  29.06.2022 दरम्यान आणि गाडी संख्या 01414 पंढरपूर- निझामाबाद विशेष गाडी दिनांक 25.06.2022 ते 30.06.2022  जून दरम्यान रद्द करण्याचे कळविले होते.

यात बदल करून आज मध्य रेल्वे ने कळविल्या नुसार गाडी संख्या  01413 /01414  निझामाबाद-पंढरपूर-निझामाबाद विशेष एक्स्प्रेस गाडी आज पासूनच म्हणजे दिनांक 25 जून पासून नियमित पणे ठरलेल्या वेळा पत्रकानुसार धावेल.

Post a Comment

Previous Post Next Post