पूर्णा येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, पुणे सोबत रेल्वे कर्मचाऱ्यांची अपघात बचाव कार्याची रंगीत तालीम

 

                                       

 
आज दिनांक 25 जून, 2022 रोजी नांदेड रेल्वे विभागातील पूर्णा येथे रेल्वे अपघात समयी करण्यात येणाऱ्या बचाव कार्याची रंगीत तालीम करण्यात आली. या मध्ये नांदेड रेल्वे विभागातील रेल्वे कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, पुणे (एन.डी.आर.एफ. पुणे) सोबत हि रंगीत तालीम केली.या रंगीत तालीम मध्ये ०६ जखमी प्रवाशांना अपघात गृस्त डब्यामधून बाहेर काढल  गेल, त्यांचा बचाव  केला आला. या मध्ये . नांदेड रेल्वे विभागातील रेल्वे कर्मचाऱ्या सोबत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, पुणे सहभागी झाले.


 


या प्रसंगी श्री नागभूषण राव, अप्पर रेल्वे व्यवस्थापक, नांदेड, श्री सूर्यनारायण , वरिष्ठ सुरक्षा अधिकारी, श्री प्रशांत कुमार, वरिष्ठ यांत्रिकी अधिकारी, आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, पुणे तर्फे श्री मनोज शर्मा, इन्स्पेक्टर आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post